सरकारी अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलिंडर जमावानं पळवले saam tv
Video

VIDEO : अशी ही पळवापळवी! सरकारी अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलिंडर जमावानं पळवले

Gas Cylinder Stolen in Amravati : महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलिंडर जमावाने पळवल्याची घटना अमरावतीतील दर्यापूरमध्ये घडली.

Nandkumar Joshi

अमर घटारे, दर्यापूर | साम टीव्ही

अमरावतीत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार व्यावसायिक ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असल्याच्या तक्रारीवरून महसूल विभागाने धडक कारवाई मोहीम सुरू केली आहे. दर्यापूर शहरात विविध व्यावसायिकांकडून घरगुती गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. दर्यापूरमधील अंजनगाव टी-पॉईंट परिसरातील काही हॉटेलमधून महसूल विभागाने घरगुती गॅस सिलिंडर जप्त केले. ही कारवाई सुरू असताना परिसरात मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले.

जमावाने अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली. पंचनामे फाडल्याचीही माहिती मिळाली. धक्कादायक म्हणजे जप्त केलेले काही सिलिंडर सरकारी वाहनातून काढून काही जण ते घेऊन निघून गेले. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. घटनेची माहिती मिळताच दर्यापूर पोलीस घटनास्थळी पोहोचले. तासाभरानंतरही सिलिंडर घेऊन गेलेल्या व्यक्तींपैकी कोणीही हजर झाले नसल्याची माहिती मिळाली. नायब तहसीलदार प्रमोद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दर्यापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : राज्याला अवकाळी पावसाचा इशारा, 'या' जिल्ह्यांना अलर्ट; पुढील काही दिवस महत्त्वाचे

Ahilyanagar Tourism : कोकण कड्याची भव्यता अन् सह्याद्रीतील थरार; करा 'या' ऐतिहासिक किल्ल्याचा रोमांचक प्रवास

HSC Result 2026 Today : बारावीचा निकाल आज! संकेतस्थळाची अधिकृत यादी एका क्लिकवर, वाचा सविस्तर

Cancer Risk Unmarried: लग्न न केल्यास कॅन्सरचा धोका वाढतो? संशोधनातून धक्कादायक सत्य समोर

Monalisa : "मला १० वेळा स्पर्श केला"; 'व्हायरल गर्ल' मोनालिसाचा दिग्दर्शकावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT