MNS Video  Saam Tv
Video

MNS News: मनसेकडून खळखट्याक! राज ठाकरेंबद्दल अपशब्द, मुजोर परप्रांतीय रिक्षाचालकाला चांगलंच तुडवलं; पाहा VIDEO

MNS Style: मुंबईत पुन्हा एकदा परप्रांतीय विरुद्ध मनसे वाद पेटला आहे. मुंबईत मराठी माणसाला आरेरावी करणाऱ्या आणि राज ठाकरेंना अपशब्द वापरणाऱ्या रिक्षाचालकाला मनसैनिकांनी चोप दिला.

Priya More

मुंबईमध्ये पुन्हा एकदा परप्रांतीय आणि मराठीचा वाद समोर आला आहे. मुंबईमध्ये मराठी तरुणाला आरेरावी करणाऱ्या आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत अपशब्द वापरणाऱ्या परप्रांतीय रिक्षा चालकाला मनसैनिकांनी चांगलाच धडा शिकवला. मनसे स्टाईलने मनसैनिकांनी परप्रांतीयाच्या कानाखाली लगावली आणि त्याला माफी मागायला लावले.

मुलुंड परिसरामध्ये ही घटना घडली. परप्रांतीय रिक्षा चालकाने मराठी प्रवाशासोबत हुज्जत घातली आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंबद्दल अपशब्द वापरले. उद्धट भाषेत बोलल्याबद्दल मराठी प्रवाशाने मनसे कार्यालयात तक्रार दिली. त्यानंतर मनसे कार्यकर्ते अनिश खंडागळे आणि मनसैनिकांनी मनसे स्टाईलने रिक्षा चालकाला धडा शिकवला.

मनसे कार्यकर्त्यांनी या रिक्षाचालकाला शोधून काढलं आणि त्याच्या कानशिलात लगावत माफी मागण्यास भाग पाडलं. यावेळी रिक्षा चालकाने माफी मागत पुन्हा असे करणार नसल्याचे सांगितलं. मनसैनिकांच्या खळखट्याकचा हा व्हिडीओ समोर आला असून सध्या तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून मुंबईसह राज्यभरात मराठी माणसांवर अन्याय करणाऱ्या परप्रांतीयांना मनसैनिक धडा शिकवत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल सुशील केडियांचं राज ठाकरेंना थेट आव्हान|VIDEO

Crime News : घरगुती वाद टोकाला गेला, निवृत अधिकाऱ्याने कुटुंबीयावर गोळ्या झाडल्या; मुलाचा जागीच मृत्यू

Maharashtra Politics : मराठी भाषा वादात हिंदूत्वाची एन्ट्री; गरीब हिंदूंना टार्गेट केलं जातंय, मंत्री नीतेश राणेंचा ठाकरे बंधूंवर प्रहार

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

SCROLL FOR NEXT