MNS leaders Bala Nandgaonkar and Nitin Sardesai arrive at Raj Thackeray’s residence with sealed envelopes amid speculation over seat-sharing talks. Saam Tv
Video

गुप्त ठिकाणी बैठक, हातात बंद लिफाफे मनसे आणि ठाकरे गटात नेमकं काय घडतंय? VIDEO

MNS And Thackeray Faction Secret Meeting: मनसे आणि ठाकरे गटामध्ये जागावाटपावरून गुप्त बैठक सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. बंद लिफाफ्यांमध्ये उमेदवारांची नावे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Omkar Sonawane

बंद लिफाफे घेऊन मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर हे शिवतीर्थावर गेले असून बंद लिफाफे यांच्या हातामध्ये दिसून येत आहे. यामध्ये मुंबईतील उमेदवारांची नावे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनसे आणि शिवसेना ठाकरे गट कोणत्या जागा लढवणार याबाबतची माहिती आणि पुरावे घेऊन बाळा नांदगावकर आणि मनसेचे नेते बैठकीसाठी गेले आहेत. ठाकरे बंधूंच्या युतीच्यावेळी राज ठाकरे यांनी जागावाटपाबाबत कुठलीही माहिती माध्यमांना दिली नव्हती. त्यामुळे मनसे आणि ठाकरे गटाचा फॉर्म्युला अजून तरी कळू शकला नाहीये. उद्यापासून उमेदवारांना पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात येतील अशी माहिती समोर आली आहे.

सकाळी 11 वाजता नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांची ठाकरेंच्या नेत्यांसोबत गुप्त ठिकाणी बैठक पार पडली. यानंतर हे दोघे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आले. त्यामुळे जागावाटपाचा निर्णय अद्यापतरी कळू शकला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव येथे मुख्याधिकारी विरोधात मोर्चा

फ्रान्समध्ये गायींमध्ये कोरोना सदृश आजाराचा कहर, लंपीमुळे 3 हजार गायींचा मृत्यू

Mangalsutra Tradition: हातात मंगळसूत्र घातल्यानं नवरा-बायकोच्या नात्यावर काय होतो परिणाम?

भयंकर! कॉलेजमधून घरी जाताना वाटेत मृत्यूने गाठलं; भीषण अपघातात २ जिवलग मैत्रिणींचा करुण अंत

रशियात थंडीचा कहर, पारा -५६ अंशांवर; शाळा-कॉलेज बंद

SCROLL FOR NEXT