Amit Thackrey News SaamTv
Video

Amit Thackrey : अमित ठाकरे दादर-माहीममधून लढणार, उद्धव ठाकरेंचा पाठिंबा, सूत्रांची माहिती

Saam Tv

मनसे युवा नेते अमित ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं निश्चित झालं आहे. दादर-माहीम मतदारसंघातून अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. विशेष बाब म्हणजे अमित ठाकरे जर विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरत असतील तर त्यांना उध्दव ठाकरे यांचा पाठिंबा असणार आहे, असं देखील सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी असं मनसेच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा होती. त्यानंतर आता अमित ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. दादर-माहीम मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे. तर विशेष म्हणजे अमित ठाकरे निवडणूक रिंगणात उतरले तर उद्धव ठाकरे त्यांना पाठिंबा देणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे एकीकडे काका-पुतण्याचा वाद राजकारणात सुरू असतानाच आता दुसरीकडे पुतण्याच्या मदतीला काका धावून येणार असल्याचं चित्र आगामी विधानसभा निवडणुकीत बघायला मिळू शकतं.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी अमित ठाकरेंना पाठिंबा दिलाच तर मनसे देखील वरळीत आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देणार नाही, अशा प्रकारच्या हालचाली सध्या सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mouni Roy: ओव्हरसाइज कोटमध्ये मौनी रॉयच्या कातिल अदा

Maharashtra News Live Updates: वंचितकडून बीड जिल्ह्यातील ३ उमेदवार जाहीर

Wayanad Loksabha By-Election: भाजपने वायनाडचा उमेदवार ठरवला, प्रियांका गांधींसमोर उभ्या राहणाऱ्या नव्या हरिदास कोण आहेत?

Mangesh kulkarni Death : 'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी काळाच्या पडद्याआड; शाहरुख खानच्या सिनेमाची लिहिती होती स्क्रिट

Bishnoi Gang Threat: बिश्नोई गँगच्या नावाने पुण्यातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाला धमकी, मागितली १५ कोटींची खंडणी

SCROLL FOR NEXT