MNS and Shiv Sena UBT workers protesting together at Masjid Bunder demanding the immediate opening of Karnak Bridge in Mumbai. saam tv
Video

Maharashtra Politics: मनसैनिक आणि शिवसैनिकांच पुन्हा एकदा आंदोलन; कर्नाक पूलाचा मुद्दा तापला|VIDEO

Mumbai Karnak Bridge: कर्नाक पूल अजूनही सुरू न झाल्याने मनसे आणि ठाकरे सेनेने संयुक्त आंदोलन केले. महापालिकेने काम पूर्ण झाल्याचा दावा केला असला तरी पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाहीये.

Omkar Sonawane

मुंबई: येथील कर्नाक पूल अजूनही सुरू न झाल्याने आज ठाकरे गट आणि मनसेने तीव्र आंदोलन केले. कर्नाक पूल सुरू करण्याच्या मागणीसाठी दोन्ही पक्षांनी एकत्रित आंदोलन सुरू केले आहे. याआधीही मराठीच्या मुद्यावर मनसे आणि ठाकरे गट एकत्र आले होते. आज पुन्हा कर्नाक पुलाच्या मुद्यावरून एकत्र आंदोलन करताना पाहायला मिळत आहे.

कर्नाक पुलाचे अजूनही काम सुरू न झाल्याने मनसैनिक आणि शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबईच्या मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून अगदी काही अंतरवर असलेला आणि डि'मेलो मार्गाला जोडणाऱ्या कर्नाक उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्याचा दावा मुंबई महापालिकेद्वारा केला आहे. परंतु अजूनही हा पुल सर्वसामान्यांसाठी सुरू झालेला नाही. 10 जून पर्यंत हा पूल सुरू करण्याचे मुंबई महापालिकेचे नियोजन होते. मात्र आता जुलै महिना सुरू झाला तरी देखील हा पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेला नाही. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंची सेना एकत्र आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik News: देव्हाऱ्याखाली दारूचा साठा सापडला, दृश्य बघून पोलिसही चक्रावले | VIDEO

Face Care: चेहऱ्याला फ्रेश आणि ग्लोईंग ठेवण्यासाठी घरच्या घरी बनवा 'हा' डी-टॅन फेसपॅक

Shocking : संतापजनक! गरोदर महिलेवर सामूहिक बलात्कार; मांत्रिकाचं 'अघोरी' कृत्य

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

Shocking : सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाने विहिरीत उडी मारून संपवलं आयुष्य; कोल्हापुरात खळबळ

SCROLL FOR NEXT