SaamTV  Amit Thackarey
Video

Amit Thackarey : अमित ठाकरेंचा पत्नीसोबत डोअर टू डोअर प्रचार, पाहा Video

Dadar - Mahim Assembly Constituency : दादर माहीम विधानसभा मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे निवडणूक लढवत असून ते पहिल्यांदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. आजपासून त्यांनी आपला प्रचार सुरू केला आहे.

Saam Tv

मनसेचे दादर माहीम मतदारसंघाचे उमेदवार अमित राज ठाकरे यांनी आजपासून डोअर टू डोअर प्रचार सुरू केला आहे. माहिम मतदारसंघ येथे मच्छीमार कॉलनी येथे अमित ठाकरे हे पत्नी मितालीसह प्रचार करत आहेत.

दादर माहीम मतदारसंघातील निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. या जागेवरून बऱ्याच राजकीय घडामोडी घडत आहेत. दादर माहीम मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. त्यांना भाजपकडून देखील जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. अमित ठाकरे यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर यांना उमेदवारी मिळाली आहे. प्रचारासाठी आता अमित ठाकरे माहीम दादरमध्ये पत्नी मितालीसह दाखल झाले असून प्रत्येक घरी जाऊन ते प्रचार करताना दिसत आहेत.

E

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: १३ वर्षांच्या मुलीचं अपहरण, ३ दिवस घरात डांबून ठेवत बलात्कार, VIDEO बनवत...

Horoscope Tuesday Update : जोडीदाराचे म्हणणे आज ऐकाचं, धनलाभ होईल; वाचा आजचे राशीभविष्य

डान्स तर असा की... खुद्द नोराही खुश झाली असती; पाहा तरुणाचा भन्नाट व्हिडिओ

Sambhaji Nagar: शिक्षकाविना शाळा! सरकारी शाळेत फक्त दोनच शिक्षक; विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता

IPS Sanjukta Parshar: लेडी सिंघम! १५ महिन्यात १६ एन्काउंटर करणाऱ्या IPS संजुक्ता परशर आहेत तरी कोण?

SCROLL FOR NEXT