Sakshi Sunil Jadhav
महत्वाची काम पूर्ण होतील. जोडीदाराच्या तब्येतीची मात्र आज काळजी घ्यावी लागेल.
"हम करे सो कायदा" असा काहीसा दिवस आहे. आपल्याला मनाला वाटेल तसेच्या तसेच आज जगाल. आपला इतरांवर प्रभाव राहील.
कधी कधी ठरवलेल्या गोष्टी तसेच जीवनात होत नाहीत. मानसिक अस्वस्थता राहील.
प्रेमाने जोडलेल्या लोकांच्या मुळे आज दिवस कृतकृत्य झाल्यासारखा वाटेल. मित्र-मैत्रिणींच्या गोतावळ्यामध्ये रहाल.
कर्मानुसार फळ मिळते हे आपल्याला माहिती आहे. आपण कर्माला कधीच चुकत नाही.
विष्णू उपासना महत्वाची ठरेल. मनात योजलेल्या गोष्टी घडताना बघून आनंद वाटेल.
अचानक धनलाभाची शक्यता आहे. मोठ्या पैशाचे योग कुठून येतील हे कळणार नाही. सावधगिरी बाळगून काम करणं गरजेचं आहे.
जोडीदार काय म्हणतो हे समजून घेणे आज गरजेचे आहे. एकमेकांच्या मताने पुढे जाल.
सुखाला समास लागेल. असा काहीसा दिवस आहे. शत्रू वाढतील ठरवलेल्या गोष्टींमध्ये अडचणी येतील.
संततीकडून सुवार्ता कानी येतील. अनेक दिवस कष्ट आणि मेहनतीने मुलीला गोष्टींमध्ये आज यश मिळेल.
आपल्या जवळच्या व्यक्तीकडून कुटुंबीयांच्याकडून चांगले सहकार्य मिळाल्यामुळे कामाला नव्याने हुरुप येईल.
बहिणीची विशेष माया लाभेल. वेगवान घटना घडतील. जवळच्या प्रवासामधून फायदा होईल.