prakash solake saam tv
Video

Maharashtra Politics: निवडणूक लढवण्यासाठी 40 लाखांची मर्यादा, पण आमदाराने खर्च केले 12 कोटी, निवडणूक आयोग झोपा काढतंय का? VIDEO

Election Commission: राष्ट्रवादीच्या आमदाराने मोठा दावा केला आहे. यामुळे निवडणूक आयोगावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Omkar Sonawane

बीड: निवडणूक कोणतीही असो, ग्रामपंचायतीपासून तर लोकसभा निवडणुकीपर्यंत उमेदवार हे पाण्यासारखा पैसा खर्च करतात. परंतु निवडणुकीत किती खर्च करावा यासाठी निवडणूक आयोगाने काही मर्यादा ठेवली आहे. एका उमेदवाराला 40 लाखांपेक्षा जास्त खर्च करता येत नाही. पण अजित पवार यांच्या आमदाराने निवडणुकीत एक दोन नव्हे तर तब्बल 12 कोटी रुपये खर्च केले आहेत. याबाबत स्वतः त्या आमदाराने एका कार्यक्रमात जाहीर वक्तव्य केले.

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे बीडचे आमदार प्रकाश सोळंके असे या आमदाराचे नाव आहे.सोळंखे म्हणाले निवडणुकीत किती उमेदवार उभे राहतात त्याला काही मोजमाप राहिले नाहीये. कुणीही येतं आणि पैशाच्या मस्तीवर निवडणूक लढवतं अशी परिस्थिति दुर्दैवाने झाली आहे.मागच्या निवडणुकीत एका उमेदवाराने 45 कोटी रुपये खर्च केले असे ऐकीवात आहे. तर एकाने 35 कोटी खर्च केले असेही ऐकले आहे.पण मी आपला 10 ते 12 कोटी पर्यंत मर्यादित राहिलो आणि निवडून आलो असा दावा आमदार प्रकाश सोळंके यांनी केला. यानिमिताने निवडणूक आयोग झोपा काढतय का? असा सवाल उपस्थित झाला आहे. निवडणुकीच्या खर्चाची मर्यादा ही 40 लाख असताना या आमदारांनी 12 कोटी खर्च केल्याने निवडणूक आयोग त्यांच्यावर कारवाई करेल का? असा सवाल सामान्य नागरिक विचारत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरातचा ताबा पुन्हा सिन्नर पोलिसांकडे

सर्वात मोठी बातमी! दोन्ही शिवसेना एकत्र येणार? उद्धव ठाकरेंच्या विश्वासू नेत्याचं मोठं विधान; राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

सुटलेलं पोट झटक्यात जाईल आत! रात्री भात खाण्याऐवजी खा 'हा' 1 पदार्थ; वजन राहील नियंत्रणात

BJP Politics: भाजपला मोठा धक्का! युवा नेता थेट दुसरा पक्ष काढणार; राजकीय वर्तुळात खळबळ

Nandurbar : महाराष्ट्रातील दुर्गम पाड्यावर पहिल्यांदाच चमत्कार घडला! गावकऱ्यांसह लहान मुलं आनंदानं उड्या मारायला लागले

SCROLL FOR NEXT