Aadivasi Reservation SaamTv
Video

Breaking News : आदिवासी आंदोलन पेटलं; आमदारांनी थेट मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी

Aadivasi Reservation News Update : आदिवासी आमदारांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर आता टोकाची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेळ देत नसल्याने मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून संतप्त आदिवासी आमदारांनी उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Saam Tv

धनगर समाजाने आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. अनुसूचित जमाती म्हणजेच एसटीचे आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुतीचे सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र त्याला नरहरी झिरवळ व इतर आदिवासी मंत्र्यांनी विरोध केला आहे. या प्रकरणी झिरवळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. पण ही भेट निष्फळ ठरल्यामुळे त्यांनी टोकाचा निर्णय घेत थेट मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण देण्याच्या निर्णयाविरोधात सत्ताधारी महायुतीचे आदिवासी आमदार चांगलेच आक्रमक झालेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शुक्रवारी यासंबंधी शुक्रवारी थेट मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. त्यांच्यासोबत आमदार हिरामण खोसकर यांनीही उडी मारली. पण हे दोघेही मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर पडल्याने बचावले. या आमदारांच्या आंदोलनामुळे काहीवेळ अवघे मंत्रालयच स्तब्ध झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: पुरूष लाभार्थी घुसलेच कसे? लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा घोटाळा

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

मुंबई-आग्रा महामार्गावर बसचा भीषण अपघात, ८ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, १५ जखमी, ४ जणांची प्रकृती गंभीर

KDMC : केडीएमसीतील कंत्राटी कामगारांचे काम बंद; सुमित कंपनीत सामावून घेण्याची मागणी

Mumbai-Goa Highway : LPG गॅस टॅंकरला अपघात, ९ तासांपासून वाहतूक ठप्प | VIDEO

SCROLL FOR NEXT