Ramesh Hinge alleges that several ministers and officials regularly visited Ashok Kharat, sparking fresh controversy Saam Tv
Video

भोंदू खरातकडे मंत्री, अधिकाऱ्यांच्या रागा लागायाच्या; PA हिंगेनं कॅमेऱ्यासमोर सगळं सांगितलं, पाहा नेमकं काय म्हणाला?

Ashok Kharat Case Explosive Pa Statement: पीए रमेश हिंगे यांनी मंत्री आणि अधिकारी खरातकडे भेटायला येत असल्याचा दावा केला असून या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Omkar Sonawane

स्वयंघोषित ज्योतिषी भोंदू अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत असताना आता त्याच्या जवळच्या व्यक्तीकडूनच मोठा दावा करण्यात आला आहे. खरातचा स्वीय सहाय्यक (PA) रमेश हिंगे यांनी ‘साम टीव्ही’वर दिलेल्या मुलाखतीत खळबळजनक माहिती उघड केली आहे. हिंगे यांच्या म्हणण्यानुसार, अशोक खरातकडे अनेक मंत्री आणि अधिकारी भेटण्यासाठी येत असत. या भेटींमुळे खरातचा प्रभाव मोठा असल्याची चर्चा होती, असा दावा त्यांनी केला. या विधानामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

माझा खरातच्या गैरप्रकारांशी कोणताही संबंध नाही, असा दावा त्यांनी केला. आपण केवळ कामाच्या निमित्ताने त्याच्यासोबत होतो, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, अशोक खरात प्रकरण आधीच गंभीर बनले असून विविध आरोपांमुळे तपास यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. हिंगे यांच्या या नव्या दाव्यांमुळे तपासाची दिशा आता संभाव्य राजकीय आणि प्रशासकीय संबंधांकडे वळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात आणखी कोणते नवे धक्कादायक तपशील समोर येतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway Missing Link: मुंबई- पुणे कनेक्टिव्हिटी बिघडली; एक्सप्रेसवेवर कोंडी नियोजनचं 'मिसिंग'

LPG Cylinder: महागाईच्या झळा, सामान्यांना 'कळा'! व्यावसायिक सिलेंडर 993 रुपयांनी महागला; खाद्यपदार्थांच्या किंमती वाढणार?

Pune Crime: गुरांच्या गोठ्यात ४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, लैंगिक अत्याचारानंतर चिमुरडीची हत्या

Mumbai Pune Missing Link : 'मिसिंग लिंक'ला विरोध; लोणावळ्यातून प्रवेश देण्याची मनसेची मागणी

Ladki Bahin Yojana: राज्यातील १ कोटी ८९ लाख लाडक्या बहिणी पात्र; ५४ लाख बहिणींना नाही मिळणार १५०० रुपये

SCROLL FOR NEXT