Minister Dada Bhuse Saam Tv
Video

Marathi Education: मोठी बातमी! मराठी न शिकवणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होणार, शालेय शिक्षण मंत्र्यांची घोषणा

Minister Dada Bhuse Warns Action Against Schools: शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेमध्ये मोठी माहिती दिली. मराठी न शिकवणाऱ्या शाळांविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Priya More

राज्यात मराठी न शिकवणाऱ्या शाळांची आणि संस्थाची मान्यता आता रद्द होणार आहे, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली आहे. राज्यातील प्रत्येक शाळेमध्ये मराठी शिकवणं अनिर्वाय आहे असे असताना देखील अनेक शाळांमध्ये मराठी शिकवले जात नाही. त्यामुळे आता या शाळांविरोधात कारवाई होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत याबाबत माहिती देताना सांगितले की, 'ज्या माध्यमांच्या शाळेमध्ये मराठी शिकवली जात नाही अशा तक्रारी आल्या तर तात्काळ त्याची चौकशी करू. चौकशीमध्ये आढळून आले की त्याठिकाणी मराठी शिकवली जात नाही. तर त्यांना तशी समज दिली जाईल. ऐवढे करूनही जर कोणतीही शाळा मराठी भाषा शिकवणं याचे पालन करत नसेल तर त्या शाळा आणि संस्थांची मान्यता रद्द करण्यात येईल.' मुंबईतील अनेक इंटरनॅशनल शाळांमध्ये मराठी शिकवले जात नसल्याचा मुद्दा शिवसेना युबीटीचे आमदार हारूण खान यांनी उपस्थित केला होता. यावर चर्चा करत असताना मंत्री दादा भुसे यांनी ही माहिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

पोटावरची चरबी मेणासारबी वितळेल! रोज न चुकता मेथीच्या दाण्याचे पाणी प्या

Famous Actor : "मला बापाला मरताना नाही पाहायचंय..."; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक, ढसाढसा रडतानाचा VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: कालच्या मुसळधार पावसानंतर नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ७० टक्के भरले

Train Cancelled : प्रवाशांसाठी मोठी बातमी! साईनगर शिर्डी एक्सप्रेससह ८ रेल्वे आज रद्द, नेमकं कारण काय? वाचा

SCROLL FOR NEXT