Asaduddin Owaisi  saam tv
Video

Asaduddin Owaisi rally : महापालिका निवडणूक प्रचारावेळी गोंधळ, अकोल्यात ओवेसींच्या सभेत राडा, पाहा व्हिडिओ

AIMIM Chief Asaduddin Owaisi : अकोल्यात एमआयएम खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेत गर्दी अनियंत्रित झाल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. सभेदरम्यान चेंगराचेंगरी होऊन काही जणांना किरकोळ दुखापत झाली.

Namdeo Kumbhar

lathi charge at Asaduddin Owaisi rally in Akola : एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेत रविवारी रात्री सौम्य लाठीमार झाला. गर्दी अनियंत्रित झाल्याने अकोला पोलिसांना हा सौम्य लाठीमार करावा लागला. या घटनेमुळे परिसरात मोठी धावपळ झाली. याचं ठिकाणी चेंगराचेंगरीही झाली. लोक एकमेकांच्या अंगावरही पडले. त्यामुळे काहींना किरकोळ दुखापतही झाली आहे. दरम्यान, अकोला शहरात काही दिवसांपूर्वी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांचीही सभा झाली होती. या सभेतही युवकांना स्टेज जवळ बोलावण्यात आले होते. यातून प्रचंड चेंगराचेंगरी झाली होती. आता पुन्हा खासदार ओवैसींच्या सभेतही हाच प्रकार घडला आहे..

मनपा निवडणुकीत एमआयएमने स्वबळावर 37 उमेदवार उभे केले आहेत. दरम्यान रविवारी रात्री खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेत सौम्य लाठीचार्ज झाला होता. सभेला आलेले लोक अनियंत्रित झाल्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. अकोल्यातील गडंकी भागातील झुल्फिकार अली मैदानावर असदुद्दीन ओवेसी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. सभेत कोणतेही नियोजन नसल्यामुळे गर्दी अनियंत्रित झाली. आणि सभा संपताना असदुद्दीन ओवेसी यांचं बेजबाबदार वर्तन देखील पाहायला मिळालं. लोकांना व्यासपीठाकडे येण्याचे आवाहन केले, त्यानंतर लोक क़ठडे तोडून व्यासपीठाकडे धावलेत. सभा संपत असताना सर्व जमाव ओवेसी यांना भेटण्यासाठी व्यासपीठाकडे येत असल्याने हा गोंधळ उडाला होता. सभेत चेंगराचेगरी ही झाली. आयोजक आणि ओवेसी यांच्या बेजाबदारपणामूळे एमआयएमच्या सभेत हा गोंधळ उडाला होता. या दरम्यान स्टेजचा काही भाग देखील तुटला होता..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आहो सुदामे! रीलस्टार अथर्व सुदामेला PMP कडून तिसरी नोटीस, 50 हजारांचा दंड

मुंबईनंतर पुण्यात तुफान राडा; शिंदे गटाच्या दोन गटाच्या २ उमेदवारांवर हल्ला, वडगाव शेरीत दगडफेक

Nashik Accident: नाशिक-पेठ महामार्गावर भीषण अपघात; दोन्ही कारचा चुराडा, ४ जणांचा जागीच मृत्यू, ६ गंभीर जखमी

Thursday Horoscope : स्वभावातला हेकेखोरपणा सोडा, नाहीतर...; ५ राशींच्या लोकांनी राहा सावधान

भाजपचा सत्तेसाठी अकोट पॅटर्न? विचारधारेला तिलांजली; AIMIM शी घरोबा, राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT