Kalyan Fire saam tv
Video

kalyan Fire : कल्याणजवळ डम्पिंग ग्राउंडला आग, धुरानं परिसर काळवंडला

Kalyan Dumping ground fire : कल्याणजवळ डम्पिंग ग्राउंडला भीषण आग लागली. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले.

Nandkumar Joshi

कल्याणजवळील उंबर्डे डम्पिंग ग्राउंडला भीषण आग लागल्याची घटना आज, मंगळवारी घडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाकडून कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाची चार वाहनेही घटनास्थळी रवाना करण्यात आली. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू केले. डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीमुळं परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते.

डम्पिंग ग्राउंडचा बराचसा परिसर आगीनं वेढला होता. कचऱ्याचे ढिग जळत होते. धुराचे लोट बाहेर पडत होते. परिसर धुराने काळवंडला होता. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने पाइपद्वारे पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: बच्चू कडूंना जबर धक्का! कार्यकर्त्यांनी बदलला 'भिडू'; शेकडो पदाधिकाऱ्यांचा ठाकरे सेनेत प्रवेश

Vidhanparishad Election: माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची नात उतरणार निवडणुकीच्या रिंगणात? मविआ टाकणार मोठा डाव

PAN Card: 2 पॅनकार्ड असल्यास काय शिक्षा होऊ शकते?

Maharashtra News Live Update: नवी मुंबईत सोमवारपासून १० टक्के पाणी कपात

Accident News : राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, कार आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाच कुटुंबातील ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT