Vasai Wedding Fighting Video Saam Tv
Video

Vasai: लग्न मंडपात तुंबळ हाणामारी, वऱ्हाडींनी एकमेकांना धूधू धुतलं; VIDEO व्हायरल

Vasai Wedding Fighting Video: वसईमध्ये लग्नमंडपात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. नवरा-नवरीकडील वऱ्हाडींनी एकमेकांना धूधू धुतलं. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Priya More

वसईच्या माणिकपूर परिसरात लग्न समारंभात चक्क दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. नवरा-नवरीकडच्या वऱ्हाडींनी एकमेकांना धूधू धुतलं. नवरदेव आणि नवरीकडून लग्नासाठी आलेल्या मंडळींकडून भरमंडपात तुंबळ हाणामारी करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. मंडपातच वऱ्हाडींनी एकमेकांना खुर्च्या फेकून मारल्या यामध्ये अनेक जण जखमी झालेत. या घटनेमुळे लग्न मंडपात आणि परिसरामध्ये तणावाचे वातावरण होते.

या घटनेप्रकरणी माणिकपूर पोलिस ठाण्यात नवरदेवाच्या गटाकडून मारहाणीची तक्रार दाखल केली. तर नवरीच्या कुटुंबीयांकडून पॉक्सो कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणात पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस या सर्वांची चौकशी करत आहेत. पोलिस ठाण्याबाहेर लग्नाला आलेल्या पाहुण्यांनी मोठी गर्दी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT