Ratnagiri Marleshwar Waterfall Saam TV
Video

Ratnagiri : पर्यटकांना खुणावतोय मार्लेश्वरचा धबधबा | VIDEO

Marleshwar Waterfall : धबधब्याच्या फेसाळ प्रवाहाने मार्लेश्वर परिसरातील भक्ती आणि निसर्गाचा संगम पाहायला मिळाला आहे. पावसाळ्यातील हे सौंदर्य डोळ्यांत साठवण्यासाठी अनेकांनी येथे भेट देण्यास सुरुवात केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोकणात सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये पाऊस चांगला कोसळतो आहे. त्यामुळे निसर्गाची रंगत खुलली आहे. या पावसामुळे डोंगरातून वाहणाऱ्या धबधब्यांच्या प्रवाहात मोठी वाढ झाली असून, रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या मार्लेश्वर येथील धबधबाही याचाच एक भाग ठरत आहे. डोंगर रांगांमधून फेसाळत कोसळणारा हा धबधबा सध्या पर्यटक आणि भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. परिसरातील डोंगररांगा हिरवाईने नटल्या असून, संततधार पावसामुळे वातावरण थोडंसं धुक्याचं आणि थंड झाले आहे. मार्लेश्वर मंदिराच्या परिसरात भक्तीचा माहोल आणि निसर्गाचं सौंदर्य यांचं अनोखं मिश्रण अनुभवायला मिळत आहे. देवदर्शनाबरोबरच निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी अनेक पर्यटक येथे गर्दी करत आहेत. पावसाळ्यातील हे सौंदर्य डोळ्यांत साठवण्यासाठी अनेकांनी येथे भेट देण्यास सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: किल्ल्यावर तरुणांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली एक जखमी, टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

GK: डावखुऱ्या लोकांचा मेंदू जास्त ॲक्टिव्ह का मानला जातो? जाणून घ्या कारणे

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

SCROLL FOR NEXT