मुंबईच्या कांदिवलीत अमराठी रिक्षाचालकांनी मराठी रिक्षाचालकाला मारहाण केली.  saam tv
Video

Mumbai News : तीन-चार अमराठी रिक्षाचालकांनी घेरून मराठी रिक्षाचालकाला केली मारहाण

Marathi auto rickshaw driver assaulted by non Marathi drivers : अमराठी रिक्षाचालकांची मुजोरी वाढली आहे. एका मराठी रिक्षाचालकाला तीन ते चार अमराठी रिक्षाचालकांनी घेरून मारहाण केली, असा आरोप होत आहे. मुंबईतील कांदिवलीत ही घटना घडलीय.

Nandkumar Joshi

मुंबई आणि ठाणे परिसरात रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मराठी अनिवार्य केल्यानंतरही यांची मुजोरी काही केल्या कमी होताना दिसत नाही. मराठी सक्तीच्या विरोधात काही परप्रांतीय रिक्षाचालकांनी कांदिवलीत गोंधळ घातला. एका मराठी रिक्षाचालकाला प्रवासी वाहतूक करण्यास विरोध केला. त्यानंतर त्या मराठी रिक्षाचालकाला मारहाण केली, असे सांगितले जात आहे.

मुंबई आणि परिसरातील रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मराठी सक्तीची करण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. परप्रांतीय रिक्षा-टॅक्सीचालकांसाठी क्लासही आयोजित केले होते. पण अजूनही काही मुजोर परप्रांतीय रिक्षा-टॅक्सीचालकांचा मराठी भाषा शिकण्यास विरोध आहे. याविरोधात काहींनी बंदचीही घोषणा केली. ही मुजोरी कमी झाली नाही तर, लायसन्स आणि बॅज रद्द करण्याचा इशारा दिला आहे. पण मराठी सक्तीला विरोध असल्याचं दिसतंय. त्याविरोधात कांदिवलीत काही परप्रांतीय रिक्षाचालकांनी विरोध केला आहे. एका मराठी रिक्षाचालकाला प्रवासी वाहतूक करण्यासही विरोध केला. पण मराठी रिक्षाचालकानं दाद दिली नाही. तर त्याला तीन चार अमराठी रिक्षाचालकांनी घेरून मारहाण केली. मनसेनं यात उडी घेतली असून, मारहाण करणाऱ्या एका रिक्षाचालकाला पकडले आहे. त्याला जाब विचारला. या मुजोर परप्रांतीयांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: बाप्पा मोरया! गणेशोत्सव 'या' राशींसाठी घेऊन येणार भरभराट; अचानक धनलाभाची शक्यता

... अन्यथा कोर्टात जाणार; मराठा क्रांती मोर्चाचा 15 दिवसांचा अल्टिमेटम, कारण काय?

Maharashtra News Live Update: लक्ष्मण हाकेंना दिलेली Y प्लस सुरक्षा तात्काळ काढा; मराठा क्रांती मोर्चाचा 15 दिवसांचा अल्टिमेटम

अमित शहा मुंबई दौऱ्यावर असतानाच केजरीवालांनी खेळला मोठा गेम; नव्या युतीनं वाढवली भाजपसह काँग्रेसची डोकेदुखी

Soak Badam Benefits: सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम खा; शरीराला मिळतील ‘हे’ ७ आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT