Maharashtra Fast News 20 20 Headlines saam tv
Video

Marathi News Headlines : कर्करोगावरील औषधं स्वस्त होणार, म्हाडा घरांच्या किमतींचे सूत्र बदलणार; वाचा २०-२० हेडलाइन्स, VIDEO

Maharashtra Fast News 20 20 Headlines : राज्यभरातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा २० - २० हेडलाइन्समधून.

Namdeo Kumbhar
  • शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची याचिका.

  • तंत्र शिक्षण विभाग अॅक्शन मोडवर...पुण्यातील 15 महाविद्यालयांना बजावली नोटीस...प्रवेश प्रक्रियेबाबत खुलासा करण्याचे निर्देश...सर्व रिक्त जागांवर नियमबाह्य पद्धतीने प्रवेश दिल्याचा संशय.

  • बदलापूर घटनेनंतर जिल्हा परिषदेच्या शाळांवर सरकारचं विशेष लक्ष. गैरवर्तन करणाऱ्या शिक्षक किंवा कर्मचाऱ्यांना बडतर्फ करा', राज्य सरकारचं जिल्हा परिषद शाळांना पत्र.

  • म्हाडा घरांच्या किमतींचे सूत्र बदलण्याची शक्यता. विकासकांकडील घरांना अल्प प्रतिसाद मिळत असल्याची माहिती...क्षेत्रफळाऐवजी किमतींनुसार विक्री गट बनवणार असल्याची चर्चा.

  • कर्करोगावरील औषधं स्वस्त होणार. औषधांवरील GST 12 टक्क्यांवरुन 5 टक्क्यांवर...GST परिषदेत केंद्र सरकारचा मोठा निर्णय.

  • भाजप खासदार कंगणा रनौतने मुंबईच्या पाली हिल परिसरातील रो-हाऊस 32 कोटींना विकलंय. 4 वर्षांपूर्वी याच रो-हाऊसवर BMC ने केली होती कारवाई.

  • परतीच्या प्रवासासाठी कोकणवासीयांना दिलासा. 15 सप्टेंबर रोजी मडगाव-पनवेल विशेष रेल्वेगाड्या...आजपासून आरक्षण करता येणार.

  • समुद्रात गणेश विसर्जन करणाऱ्यांनी जेली फिश, स्टिंगरेंच्या दंशांपासून सावध रहावं, मुंबई महापालिकेचं आवाहन. दंश करू शकणारे मासे ट्रायल नेटिंगमध्ये आढळले.

  • माहेरवाशिणीच्या स्वागताला महिलांची लगबग, घरोघरी गौरीपुजनाची तयारी. लोणावळ्याचा बाजारपेठेत गौरींचे सुरेख मुखवटे दाखल. तर, सजावटीचं साहित्य, दागिने, हार फुलांच्या खरेदीसाठीही झुंबड.

  • व्हिएतनाममध्ये तीव्र वादळामुळे क्षणार्थात पूल कोसळला. पूल कोसळल्यानं अनेक वाहनं नदीत पडल्याची दुर्दैवी घटना. थरारक दृश्य समोर.

  • अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात दाणादाण... मराठवाड्यात 18 लाखांहून अधिक हेक्टरवर नुकसान... खरीप पिकांसह फळबागांना मोठा फटका.

  • भंडारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी. गोसीखुर्द धरणाचे 25 दरवाजे उघडले. नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा.

  • शेतकऱ्यांना मिळणार नवीन ओळख. ऑक्टोबरपासून आधारप्रमाणे विशेष ओळखपत्रासाठी नोंदणी.... विविध योजनांमधून दिली जाणारी मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार.

  • यवतमाळ जिल्ह्यात अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांची पीकविमा कंपन्यांकडे तक्रार. दीड लाख तक्रारींपैकी 60 हजार तक्रारींची दखल नाहीच. तक्रारींची दखल न घेतल्यानं बळीराजा धास्तावला.

  • आजपासून युगेंद्र पवार यांची स्वाभिमान यात्रा. बारामतीच्या कन्हेरीतील मारुती मंदिराचे दर्शन घेऊन यात्रेला सुरुवात. गावांमध्ये नागरिकांशी मुक्त संवाद साधणार.

  • 9 कॅरेटच्या सोन्यासाठीही हॉलमार्किंग बंधनकारक करण्याचा भारत सरकारचा विचार. कमी शुद्धतेच्या सोन्यालाही मागणी वाढली, भारतीय मानक ब्युरोची संबंधित हितधारकांशी चर्चा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Drinks: हिवाळ्यात हे आरोग्यदायी पेय प्या आणि शरीराला ठेवा उबदार

असंख्य घरांमध्ये लपलीये एक मांजर; तुम्ही १० सेकंदात शोधून दाखवाच!

Solapur Airport : सोलापूरकरांसाठी मोठी गुडन्यूज! 'या' तारखेपासून सुरू होणार विमानसेवा, मुंबई-गोव्याला काही तासात पोहचणार!

Jui Gadkari: जुई गडकरी शुटिंग सुरू असताना सेटवर फावल्या वेळेत काय करते? Video केला शेअर

Pav Bhaji: घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल पावभाजी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT