CM Devendra Fadnavis On Bhaiyyaji Joshi Remark at Vidhansabha  saam tv
Video

VIDEO : भैयाजी जोशींच्या वक्तव्यानं उफाळला वाद; देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई, महाराष्ट्राची भाषा मराठीच

Devendra Fadnavis on Bhaiyyaji Joshi Remark : मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यावर उफाळलेल्या वादावर फडणवीसांनी विधानसभेत हे उत्तर दिले.

Nandkumar Joshi

मुंबईत प्रत्येकानं मराठी भाषा शिकली पाहिजे असं नाही, असं वक्तव्य केल्यानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैयाजी जोशी यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. यावरून विरोधकांनी सत्ताधारी महायुती सरकारला धारेवर धरले आहे. हा महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा अपमान आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली होती. विधानसभा अधिवेशनातही या वक्तव्याचे पडसाद उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबत उत्तर दिले.

सरकारची भूमिका पक्की आहे. मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा ही मराठीच आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे. प्रत्येकाला मराठी बोलता आली पाहिजे. भैयाजी जोशी यांचंही माझ्या वक्तव्याशी दुमत असेल असं वाटत नाही, अशा शब्दांत फडणवीसांनी उत्तर दिले.

मी पुन्हा एकदा सरकारच्या वतीने सांगतो की इतर भाषांचा इथे सन्मान आहे. कुठल्याही भाषेचा अपमान करणार नाही. स्वतःच्या भाषेवर जो प्रेम करतो, तोच दुसऱ्याच्या भाषेवरही प्रेम करतो, असेही फडणवीस यांनी निक्षून सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिलेल्या उत्तरावर आदित्य ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली. मी मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या भूमिकेबद्दल त्यांचे आभार मानतो, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime: मुंबई हादरली! ९ वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, ६ जणांकडून अश्लिल व्हिडीओद्वारे ब्लॅकमेल

Skin Care: चेहरा ड्राय झालाय आणि ओपन पोर्स वाढलेत? मग, चेहऱ्यावर रोज स्प्रे करा हे घरी तयार केलेले फेस मिस्ट

Maharashtra News Live Update: पोलादपुर महाबळेश्वर जोडणारा आंबेनळी घाट 16 ऑगस्ट पर्यंत बंद राहणार

TET Exam Scam: टीईटी पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, नामांकित पोलिस प्रशिक्षण केंद्र चालवणाऱ्याला अटक

Lanja Tourism : पावसाळ्यातील नंदनवन! लांजाजवळील 'या' ठिकाणी घ्या निसर्गाचा मनमुराद आनंद

SCROLL FOR NEXT