राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सध्या महाराष्ट्रात जनसंवाद यात्रा काढली आहे. आज त्यांची यात्रा मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे आली. यावेळी मराठा तरुणांनी अजित पवार यांच्यासमोरच "एक मराठा लाख मराठा" अशी घोषणाबाजी केली. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.
पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून मराठा आंदोलकांना बाजूला केलं. यानंतर अजित पवार यांना मराठा आंदोलकांनी एक निवेदनही दिले. सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी मागणी आंदोलकांनी अजित पवार यांच्याकडे केली.
त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका जाहीर करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा विटंबन प्रकरणी योग्य ती कारवाई करून महाराष्ट्राला साजेसा पुतळा तिथे उभा करावा, अशा इतर मागण्याही मराठा आंदोलकांनी केल्या.
विशेष बाब म्हणजे महाळुंगरा पाटी येथील मराठा तरुणांनाही अजित पवार यांच्यासमोर घोषणबाजी केली होती. आता महाळुंगरा महाळुंगरा पाटी येथीलही मराठा आंदोलकांनी केलेल्या घोषणबाजीमुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.