Maratha Protest In Pune: Pune-Satara Road Blocked saam tv
Video

मराठा बांधव आक्रमक! पुणे-सातारा रस्ता अडवला; जोरदार घोषणाबाजी|VIDEO

Maratha Reservation Protest At Katraj Chowk Pune: पुण्यातील कात्रज चौक परिसरात मराठा समाजाच्या बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आंदोलन केले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुणे-सातारा रस्ता अडवत ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा देण्यात आल्या.

Omkar Sonawane

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ पुण्यात मराठा समाजाचे बांधव एकवटले आहेत. पुण्यातील कात्रज चौक परिसरात मराठा समाजाच्या बांधवांकडून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत ‘एक मराठा, लाख मराठा’ असा नारा दिला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांनी आपली भूमिका स्पष्ट करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा समाजाचे बांधव कात्रज चौक परिसरात एकत्र आले. यावेळी आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, आंदोलनामुळे कात्रज चौक परिसरात काही काळ वातावरणात तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा जमा झाला असून आंदोलकांची धरपकड सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिहारमध्ये मोठी दुर्घटना! गंगा नदीत २० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

महायुतीत समन्वयाचा 'दुष्काळ', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाराज?

Fact Check: ऑनलाईन शॉपिंग महागणार? ऑनलाईन शॉपिंगवर 5% GST?

नवी मुंबई महापालिकेत मतदार राहतात, वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर 27 मतदारांची नोंद

IMD Alert: महाराष्ट्रासह 17 राज्यात धो-धो बरसणार वरूणराजा; 60 ताशी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

SCROLL FOR NEXT