Manoj Jarange News SaamTv
Video

Manoj Jarange : मनोज जरांगे स्वत: विधानसभा लढवणार? केलं मोठं वक्तव्य, पाहा Video

Maratha Activist Manoj Jarange PC News : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील या निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली पुढची भूमिका स्पष्ट केली आहे.

Saam Tv

यंदा विधानसभा निवडणुकीमध्ये मोठी चूरस निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण यंदा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील या निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली पुढची भूमिका स्पष्ट केली आहे. समीकरण जुळणं अत्यंत आवश्यक आहे, एका जातीवर निवडणूक लढवल्या जात नाहीत. तुम्ही इकडे गर्दी करू नका, तुम्ही इकडे गर्दी केली की मला काही काम सुचत नाही. मराठा, मुस्लिम, दलित एकत्र यायला पाहिजे, मग राज्यात शंभर टक्के परिवर्तन होऊ शकतं. समाज निर्णय प्रक्रियेत उभा राहणार आहे का? हे बघणं महत्त्वाचं आहे. 30 तारखेला दलित मुस्लिम मराठा यांचा काय निर्णय बाहेर निघतो हे बघणं महत्त्वाचं आहे, असं मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. ज्या ठिकाणी उमेदवार निवडूण येण्याची शक्यता आहे, तिथे उमेदवार देणार आणि जिथे शक्यता कमी वाटते, तिथे जे उमेदवार आमच्या मागण्यांना समर्थन देतील त्यांना पाठिंबा देणार अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा या सर्व पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटील यांची महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद पार पडली.

Edited By Rakhi Rajput

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde Property: मुख्यमंत्री शिंदेंच्या संपत्तीत २६ कोटींनी वाढ, १५ कोटींचं कर्ज; जाणून घ्या एकूण संपत्तीचा आकडा

ST Bus Accident: पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात! दोन एसटी बसची समोरासमोर धडक, ४० हून अधिक प्रवासी जखमी

Maharashtra News Live Updates : ⁠पुणेकरांना आता दिवाळीची खरेदी रात्री दीड वाजेपर्यंत करता येणार

C-295 Aircraft Specialty : कसं आहे टाटांच्या फॅक्टरीमध्ये तयार होणारं C-295 एअरक्राफ्ट; भारताने वाढवलं चीन-पाकिस्तानचं टेन्शन

Maharashtra Election: लोकसभेत तह विधानसभेत चेकमेट; पुरंदरमध्ये राष्ट्रवादीनेच वाढवलं महायुतीच्या विजय शिवतारेंचं टेन्शन

SCROLL FOR NEXT