Gadchiroli  SAAM TV
Video

Gadchiroli : गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; नक्षल्यांचा म्होरक्या भूपतसह 61 जण शरण | VIDEO

Devendra Fadnavis : गडचिरोली पोलीस आणि महाराष्ट्राच्या गृह विभागाच्या माओवाद विरोधातील लढाईला आजवरचं सर्वात मोठं यश प्राप्त झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या समोर नक्षलवादी मल्लोजूला वेणुगोपाल राव भूपतींनी आत्मसमर्पण केलंय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गडचिरोली पोलिसांना आणि राज्याच्या गृह विभागाला माओवादीविरोधातील लढाईत आजवरचं सर्वात मोठं यश मिळालं आहे. माओवादी संघटनेचा पॉलिट ब्युरो आणि सेंट्रल कमिटी मेंबर मल्लोजूला वेणुगोपाल राव उर्फ भूपती यांनी आपल्या 61 सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. विशेष म्हणजे, भूपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच आत्मसमर्पण करण्याची अट ठेवली होती. गडचिरोलीत झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत भूपतींनी शस्त्रं खाली ठेवून समाजमुखी वाटचालीची नवी सुरुवात केली. पोलिस आणि प्रशासनाने या आत्मसमर्पणाचं स्वागत करत, हे राज्यातील माओवादीविरोधी मोहिमेतील ऐतिहासिक यश असल्याचं म्हटलं आहे. या घटनेनंतर गडचिरोलीत आनंदाचं वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Internal Rift: काँग्रेसमध्ये चाललंय काय? माजी आमदारासह तब्बल २९ नेत्यांना धडाधड आल्या नोटीस, नेमकं प्रकरण आहे काय?

Maharashtra Farmer Scheme: आनंदी आनंद! कर्जमाफीनंतर शेतकरी, शेतमजुरांसाठी राज्य सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय

पुढील २० तासात महाराष्ट्रासह २५ राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; ताशी ७५ किमी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

गणेशोत्सवात 12 दिवस ड्राय डे! मद्यविक्रीला कुठे राहणार बंदी?

MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य; सरकारनं घेतले तीन मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT