CM Devendra Fadnavis on Manoj Jarange protest  saam tv
Video

Manoj Jarange : मनोज जरांगे मुंबईकडे रवाना, CM देवेंद्र फडणवीस परवानगीबाबत स्पष्टच बोलले, पाहा व्हिडिओ

CM Devendra Fadnavis on Manoj Jarange protest : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना झाले असून, आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी देण्याबाबत केलेल्या अर्जावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

Nandkumar Joshi

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. अंतरवाली सराटीत उपोषणाला बसल्यानंतर प्रकृती खालावली असली तरी, जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. काही मोजक्याच सहकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांचा ताफा मुंबईकडे निघाला आहे. मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसण्यावर जरांगे ठाम आहेत. मुंबई पोलिसांकडे त्यांनी परवानगीसाठी याआधीही अर्ज केले होते. पण त्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यांच्या सहकाऱ्यांनी पुन्हा परवानगीसाठी अर्ज केला आहे. जरांगेंचे मुंबईत आंदोलन आणि त्याला परवानगी देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

फडणवीस म्हणाले की, 'कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही पोलिसांची जबाबदारी आहे. पोलीस या संदर्भातील निर्णय घेतात. जरांगेंकडून त्यांच्याकडे अर्ज आला होता. तो नाकारण्यात आला आहे. आता परवानगीसाठी त्यांनी पुन्हा अर्ज दिला आहे. मेरिटप्रमाणे पोलीस त्यावर कार्यवाही करतील.'

मुंबई, पुण्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या उत्सवात कुठलंही विघ्न येऊ नये अशी अपेक्षा आहे. आंदोलने होत असतात. याआधीही केली. यापुढेही ते करू शकतात. यावेळी त्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. ज्या मागण्या कायदेशीर होत्या, त्या मान्य करण्यात आल्या आहेत. जरांगेंनी एकूण १३ मागण्या केल्या होत्या. त्यातील १२ मान्य करण्यात आल्या आहेत. एक मागणी मान्य होऊ शकत नव्हती, त्यामागे कायद्याची काय अडचण होती, हे त्यांना समजून सांगण्यात आलं. त्याच्यामुळे कोर्टाच्या विरोधात गेलो तर मराठा समाजाचं नुकसान कसं होईल हे देखील समजून सांगितलं आहे. मला असं वाटतं अशा पद्धतीने भूमिका न घेता सणासुदीच्या दिवसात लोकांना त्रास होणार नाही असा निर्णय त्यांनी घेणे अपेक्षित आहे, असेही फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Temple : ४०० वर्ष जुनं गणपती मंदिर अन् स्वच्छ समुद्रकिनारा, रत्नागिरीतील 'या' ठिकाणाची परदेशी पर्यटकांनाही भुरळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतात विलीन; राजकारणात शोककळा

BJP MLA : ४,००० कोटींची संपत्ती, पण भाजप आमदाराने मागितली भीक; मिळाले फक्त ८४ रुपये, राज्यात चर्चा

Maharashtra News Live Update: कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांचं कोरड्या विहिरीत उतरून आंदोलन

सहकारी साखर कारखान्यांसाठी राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय; शासनाकडून मिळणार पाठबळ

SCROLL FOR NEXT