Manoj Jarange Patil Rally  Saamtv
Video

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे लढणार की नडणार? काय असेल विधानसभेसाठी रणनीती? पाहा व्हिडिओ

Girish Nikam

मुंबई : मराठा आरक्षणावरुन जरांगे आणि सरकारमध्ये संघर्ष आणखी तीव्र झालाय. जरांगेंनी मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाचा मुहूर्तावर १७ सप्टेंबरपासून सातवं आमरण उपोषण सुरु केलं होतं. मात्र प्रकृती खालावल्याने उपोषण स्थगित केलं. त्यानंतर त्यांनी वारंवार आचारसंहिता लागायच्या आत आरक्षण देण्याची मागणी सरकारकडे केली होती. मात्र जरांगेंच्या इशाऱ्याची सरकार दखल घेतली नाही. निवडणुका जाहीर झाल्यानंतर भाजपचा सुपडा साफ करणार असा इशारा जरांगेंनी दिलाय. पाडणार की लढणार 20 ऑक्टोबरला ठरणार, असल्याचं जरांगेंनी म्हटलंय. महायुतीनं काय काय दिलं याचा जरांगेंनी विचार करावा, असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री शिंदेंनी दिलंय.

विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छूक उमेदवारांशी जरांगे उद्या चर्चा करणार आहेत. सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत चर्चा करणार आहेत. ज्या बांधवांनी अर्ज केले आहेत. त्यांनी उद्या चर्चेसाठी यावे. पण उद्या चर्चेला आलेल्यांनी तिकीट फायनल झाले असं समजू नये, असं जरांगेंनी स्पष्ट केलंय. 20 ऑक्टोबरला मराठा समाजाची बैठक बोलावून अंतिम निर्णय घेणार असल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलंय.

जरांगेंच्या आंदोलनाला वर्ष झालं आहे. उपोषण, शांतता रॅली, नेत्यांना गावबंदी अशा आंदोलनातून त्यांनी सरकारची कोंडी केली आहे. आता जरांगेंनी थेट सत्तेत येण्याची रणनीती आखलीय. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जरांगेंनी हा डाव टाकलाच तर त्यांना किती यश येणार आणि कुणाचं राजकीय समीकरण बिघडणार याबाबत महाराष्ट्राला उत्सुकता लागलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : जोडीदार लाभण्याचा आजचा योग, मोठ्या जबाबदाऱ्या मिळतील; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज पैसा अधिक खर्चा होईल, शिवाची उपासना फलदायी ठरेल, वाचा आजचे तुमचं राशीभविष्य

Viral Video : उंदीर आहे की, वाघाचं पिल्लू...? एवढा भयंकर प्राणी तुम्ही कधी पाहिलात का?

Maharashtra Assembly Election 2024 : तिसरी आघाडी, काम बिघाडी; विधानसभा निवडणुकीत कोणाची मते खाणार? पाहा व्हिडिओ

India and New Zealand Test: पावसाने बदलली वेळ! बेंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कसे असेल हवामान? जाणून घ्या Weather रिपोर्ट

SCROLL FOR NEXT