Maratha activist Manoj Jarange Patil speaking after ending his hunger strike, demands narco test on Dhananjay Munde. saam tv
Video

जरांगेंची मंत्री विखे पाटलांकडे खळबळजनक मागणी, परळीवाल्या आता...; काय घडलं? VIDEO

Jarange Patil demand narco test on Dhananjay Munde details: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर धनंजय मुंडेंच्या नार्को टेस्टची खळबळजनक मागणी केली आहे. या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Omkar Sonawane

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर त्यांनी रात्री 1 वाजेच्या सुमारास आपले आमरण उपोषण मागे घेतले. उपोषणादारम्यान कडाक्याच्या उन्हात त्यांची प्रकृती खालावली, त्यामुळे त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांना पुढील 48 तास विशेष निगराणीखाली ठेवण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

तसेच मनोज जरांगे पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी मराठा आरक्षणाबाबत सविस्तर चर्चा केल्यानंतर एक खळबळजनक मागणी केली. या मागणीबाबत त्यांना आज प्रश्न विचारताच ते म्हणाले, परळीवाल्या आता पुन्हा धारेवर धरणार आहे. धनंजय मुंडेची नार्को टेस्ट करा. ही टेस्ट केली की सगळेच उघडे होईल. आंधळे प्रकरणात काय झाले, संतोष देशमुखांचे काय झाले, सगळे कळेल .

काही महिन्यांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालीन अशी धमकी देणाऱ्या वाल्मीक कराड समर्थकाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती याच्याशी संबंधित असून याच विषयावर मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार हल्ला बोल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर जोरदार पाऊस

Rain Alert : राज्यात मुसळधार पाऊस धुमाकूळ घालणार! ३१ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता; IMD चा मोठा अलर्ट

Building Collapse : भिवंडी हादरली! ४ मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली; दोघांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती

PM modi Video : पेपर लीकप्रकरणी पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ मेसेज, घोटाळेबाजांना कडक इशारा

Today's Horoscope : 'या' ६ राशींसाठी शु्क्रवार अत्यंत भाग्यशाली! अचानक होणार धनलाभ? पाहा तुमचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT