तुमच्या मनात जे आहे, तुमची जी इच्छा आहे, तेच आपण करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. वेळप्रसंगी मरण स्वीकारेल मात्र, तुमची मान खाली जाऊ देणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हंटलं आहे. बीड जिल्ह्यातील धाकटी पंढरी असलेल्या शिरूर तालुक्यातील श्रीक्षेत्र नारायणगडावर आज मठाधिपती शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली 300 एकरात जरांगे पाटील यांचा पहिला दसरा मेळावा होत आहे. यावेळी उपस्थित मराठा समाजाला संबोधित करताना जरांगे बोलत होते.
लवकर निर्णय घ्या, असे मला सांगितले जात आहे. त्यांना तयारी करायला वेळ लागणार असल्याचे ते सांगत आहेत. मात्र, गेल्या 13 महिन्यांपासून आपण तयारीच केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारने आरक्षण जाहीर करावे, नसता आचारसंहिता लागल्यानंतर आपण आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हंटलं आहे. मराठा समाजाची मुले प्रशासनात गेले पाहिजे. मात्र, त्यांना जाऊ द्यायचे नाही, अशी काही लोकांची इच्छा आहे. मात्र, आपण त्यांना अधिकारी पदावर नेल्याशिवाय शांत बसायचे नाही, असे आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. त्यामुळे मराठा समाजाने सावध व्हावे, असे आवाहन देखील त्यांनी केले. जर आपल्या समाजाला न्याय मिळाला नाही तर, आपल्याला या वेळी उलथापालथ करावीच लागणार असल्याचे आवाहन देखील त्यांनी केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.