मनोज जरांगेंनी मुंबईत येऊ नये, असे आवाहन उदय सामंत यांनी केले. saam TV
Video

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंनी मुंबईत येऊ नये; उदय सामंत यांचे आवाहन

Manoj Jarange Mumbai march latest news : मनोज जरांगे यांनी मुंबईत येऊ नये. गणेशभक्तांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन मंत्री उदय सामंत यांनी केले.

Nandkumar Joshi

Manoj Jarange Mumbai protest latest news : मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येत असल्याची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनासाठी त्यांच्या समर्थकांनीही मुंबई पोलिसांकडे परवानगी मागितली आहे. पण मनोज जरांगे यांनी मुंबईत येऊ नये, असे आवाहन मंत्री उदय सामंत यांनी केले. जरांगेंना अनेकदा सर्वांनी समजून सांगितले आहे. त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत, असा दावाही त्यांनी केला.

गणेशोत्सव महाराष्ट्रासह देश आणि जगभरात मोठ्या उत्साहात साजरा होतो. गणेशोत्सवात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. हिंदू सणात अडथळा निर्माण होऊ नये अशी भूमिका जरांगे यांनी घ्यावी. तसेच गणेशोत्सव काळात शांतता आणि सुव्यवस्था कायम ठेवावी, असेही ते म्हणाले.

दुसरीकडे मंत्री जयकुमार गोरेंनी देखील जरांगेंना आवाहन केले आहे. मराठा आरक्षणासाठी चर्चा आणि संविधानाचा आदर ठेवावा, असे ते म्हणाले. आंदोलनात कोणतीही अनुचित प्रकार घडणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी आणि शासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनीही जरांगेंच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिलीय. मुंबईत जाण्याचा सर्वांना अधिकार आहे. लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार आहे. सरकार कोणत्याही पातळीवर चर्चेसाठी तयार आहे. मुंबईमध्ये येण्यासंदर्भात आक्षेप असण्याचे कारण नाही, असे दरेकर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक; काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी?

विधानसभा निवडणुकांआधी २ राज्यांत मोठा उलटफेर; काँग्रेसनं मोक्याच्या क्षणी मारला चौका

Maharashtra Politics : भाजप, शरद पवार गटाला मोठा धक्का; माजी मंत्री नाईकांच्या नातीसह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पूर्णेकर हत्येवरून ठाकरे-शिंदे संघर्ष टोकाला, नाईकांनी करावं ठाण्याचं नेतृत्व ' राऊतांनी शिंदेंना डिवचलं

Maharashtra News Live Update: आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ मंदिर दर्शनासाठी एक महिना बंद

SCROLL FOR NEXT