Manoj Jarange On Devendra Fadnavis  x
Video

Manoj Jarange Patil: माझं आणि फडणवीसांचं वैर संपलं, उपोषण सोडायला या; जीआर हाती येताच मनोज जरांगेंचं आवाहन, पाहा VIDEO

Manoj Jarange On Devendra Fadnavis: मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं. सरकारने जीआर काढल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं. जीआरची प्रत हाती येताच मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं.

Priya More

मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत. सरकारकडून हैद्राबाद गॅझेटचा जीआर काढण्यात आला. हा जीआर मनोज जरांगे पाटील यांच्या हाती देण्यात आला. जीआर मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले होते. सरकारने काढलेल्या जीआरची प्रत घेऊन मराठा उपसमितीचे सदस्य जरांगे पाटील यांच्या भेटीला आले. यावेळी मनोज जरांगे यांच्याकडे जीआर सोपवण्यात आला. त्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं.

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारने काढलेला जीआर स्वीकारला. जीआर मिळाल्यानंतर मनोज जरांगे यांनी सरकारचे आभार मानले. यावेळी त्यांनी सांगितले की, विखे-पाटील, सामंत, सरनाईकसाहेब हे सर्वजण इथे आले आहेत. माझी एक इच्छा आहे या सर्व कामाचे श्रेय विखे-पाटील यांना जातेच पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपोषण सोडायला यावे. तुमचं आणि आमचं वैर संपलं.' तसंच, 'मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी आजचा सुवर्ण क्षण आहे.', असे मनोज जरांगे यांनी सांगितले. 'चांगल्या कामासाठी आमच्या घरी स्वागत राहिल.', असे विखे पाटील यांनी जरांगेना सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोपी अशोक खरातचं घर तोडलं गेलं पाहिजे, यशोमती ठाकूर यांची मागणी

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ₹६९,००० होणार? फिटमेंट फॅक्टरबाबत मोठी अपडेट

180 महिला, 350 महिलांसोबत अश्लील व्हिडिओ; आरोपी अयान अहमदच्या घरावर बुलडोझर|VIDEO

Mumbai crime : मुंबईत भररस्त्यात तरुणीला अमानुष मारहाण; दोघांनी लाथाबुक्क्यांनी तुडवले

Lalit Prabhakar: ललित प्रभाकर साकारणार 'ढसाळ'; दलित पँथरच्या नामदेव ढसाळांचे जीवनपट मोठ्या पडद्यावर

SCROLL FOR NEXT