Manoj Jarange addressing media in Mumbai as he levels serious allegations against Dhananjay Munde. Saam Tv
Video

चौकशीपासून वाचण्यासाठी धनंजय मुंडेंनी अजितदादांचे पाय पकडले; माझ्या अंगावर गाडी घालण्याचा डाव, जरांगेंचे गंभीर आरोप|VIDEO

₹2.5 Crore Supari Claim By Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर 2.5 कोटींची सुपारी देऊन माझ्या जीवावर बेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. नार्को टेस्टची मागणी, पोलिस आणि गृहमंत्रालयाच्या निष्क्रियतेवर सवाल, तसेच माझ्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न झाल्याचा दावाही त्यांनी केला.

Omkar Sonawane

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य केले आहे. मुंडे यांनी माझा घातपात करण्यासाठी सुपारी दिली आहे. मी नार्को टेस्टसाठी तयार आहे. माझी आणि धनंजय मुंडे या दोघांची नार्को टेस्ट करा. मुंडे यांना माझ्या अंगावर गाडी घालायची आहे. त्यांनी मैदानात यावे. मी तयार आहे. असे थेट आव्हान जरांगे यांनी मुंडेंना दिले.

ते सोमवारी मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते. धनंजय मुंडे यांना मला ठार मारायचे आहे. पोलिसांच्या ताब्यातील तीन आरोपींनी धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं आहे. तरीही जालना पोलीस आणि गृहमंत्रालयाने धनंजय मुंडे यांना अटक का केली नाही किंवा चौकशीसाठी बोलावले नाही. जरांगे पुढे म्हणाले, माझ्या कोर्टात सिद्ध झालंय. धन्याने माझी 2.5 कोटींची सुपारी दिली आहे. मी पोलीस बंदोबस्त नाकारला आहे. फडणवीससुद्धा त्याला सांभाळत आहे. क्रूर माणसाला सांभाळू नका. पहिले देवेंद्र फडणवीस असे नव्हते. हे चांगलं नाही. असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकमधील पर्यावरणप्रेमी आणि पालिका प्रशासन यांच्यातील बैठक निष्फळ

धक्कादायक! भरधाव कारने ६ जणांना उडवलं, रस्त्यावरील श्वानालाही चिरडलं

Shocking: राजकारणात खळबळ! बड्या राजकीय नेत्याची हत्या, छातीत झाडल्या ३ गोळ्या

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त व्याजातून दर महिन्याला मिळणार ६१,००० रुपये

Pineapple Benefits: हिवाळ्यात अननस खाल्ल्याने होतात हे ७ आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT