Rohit Pawar reveals official report against Manikrao Kokate, intensifying Maharashtra Assembly card game row Saam Tv
Video

माणिकराव कोकाटे सभागृहात किती वेळ रम्मी खेळत होते? रोहित पवारांनी वेळेचा आकडाच सांगितला|VIDEO

Rohit Pawar Tweet About Manikrao Kokate: विधानसभेत माणिकराव कोकाटे केवळ ४२ सेकंद नव्हे, तर तब्बल १८ ते २२ मिनिटे पत्ते खेळत होते, असा खळबळजनक दावा रोहित पवार यांनी केला असून, यासंदर्भातील अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Omkar Sonawane

माणिकराव कोकाटे यांचा विधीमंडळात पत्ते खेळतानाचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी व्हायरल केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. यामुळे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी कोकाटे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. कोकाटेना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल खडेबोल देखील सुनावले. मात्र आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा धक्कादायक दावा केला आहे.

कृषिमंत्री सभागृहात केवळ 42 सेकंद पत्ते खेळत नव्हते तर तब्बल 18 ते 22 मिनिटे पत्ते खेळत असल्याचा विधानमंडळाच्या चौकशीचा अहवाल असून हा अहवाल मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याकडे देखील सादर केला असल्याची माहिती आहे, असे रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Maratha Protest : मराठा आंदोलनाच्या याचिकेवर हायकोर्टचा काय निर्णय? | VIDEO

Bird Flu : बर्ड फ्लूमुळे पुन्हा चिंता वाढली, सर्दीसारखी सुरुवात, वेळीच ओळखा सामान्य वाटणारी लक्षणे

Maratha Protest vs OBC: राज्यातील वातावरण तापणार; मुंबईत एकीकडे मराठा आंदोलन, दुसरीकडे OBC नेत्यांची बैठक

Muramba Serial: रमा करणार आरोहीची इच्छा पूर्ण? 'मुरांबा' मालिकेत पुन्हा येणार नवा ट्विस्ट

Manoj jarange patil protest live updates: खासदार शाहू महाराज छत्रपती यांचे पत्र, मराठा आंदोलनावर स्पष्ट केली भूमिका

SCROLL FOR NEXT