Lungi news report  Saam TV
Video

Bengaluru Mall News : लुंगी घातलेल्या व्यक्तीला प्रवेश नाकारला, बंगरुळूमधील धक्कादायक घटना

लुंगी घातली म्हणून एका व्यक्तीला मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला आहे. बंगरुळूमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

Tushar Ovhal

कोणी कसं राहावं,काय कपडे घालावे हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो,यावरुन अनेकदा वादही होतात. मात्र दक्षिण भारतीय संस्कृतीचा भाग असलेली लुंगी घातली म्हणून मॉलमध्ये प्रवेश नाकारल्याची धक्कादायक घटना घडलीये... फकिराप्पा या वृद्धाला पारंपरिक दक्षिण भारतीय पोशाख असलेली लुंगी घातल्यानं मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. फकीरप्पा आणि त्यांचा मुलगा मॉलमध्ये चित्रपट पाहण्यासाठी आले होते. मात्र, प्रवेशद्वारावरच मॉलच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांची अडवणूक केली. या बाप-लेकाकडे त्यांची प्री-बुक केलेली चित्रपटाची तिकिटं असूनही त्यांना मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. फकीराप्पांना कपडे बदलून येण्यास सांगण्यात आलं. सुरक्षा रक्षकानं त्यांना शेवटपर्यंत आतमध्ये जाऊ दिलं नाही. फकिराप्पांच्या मुलानं यासंदर्भातील व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओ व्हायरल झाला आणि नेटकऱ्यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Rain: अवकाळीचा फटका 'लालपरी'ला, एसटी बसला लागली गळती; VIDEO व्हायरल

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 34% ने वाढ?

महाराष्ट्रात बदल्याचा धडाका कायम; आता २५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Pune : पुणे बनतंय ड्रग्ज कॅपिटल; अल्पवयीन मुलीमुळे ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप? राष्ट्रवादी-शिंदेसेनेचे 50 आमदार भाजपात जाणार, बड्या नेत्याचा दावा

SCROLL FOR NEXT