Jitendra Awhad saam tv
Video

ठाण्यात मोठी उलथापालथ! कट्टर समर्थकाने ऐनवेळी राष्ट्रवादी सोडली, आता आव्हाडांच्या पत्नी मैदानात

Thane political crisis : ठाण्यात शिंदे गटाने राष्ट्रवादीला मोठा धक्का देत माजी महापौर मिलिंद पाटील आणि नऊ नगरसेवकांना आपल्या गटात सामील करून घेतले. या पार्श्वभूमीवर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड या निवडणूक लढवणार आहेत.

Namdeo Kumbhar

Maharashtra NCP crisis Thane local politics : ठाण्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, शिंदे गटाने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे माजी महापौर मिलिंद पाटील यांच्यासह नऊ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशामुळे कळवा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर गेली आहे. या धक्क्यानंतर, आव्हाड गटाने नवी रणनीती आखली आहे. पक्षांतर केलेल्या नगरसेवकांना त्यांच्याच प्रभागात आव्हान देण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड या स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ऋता आव्हाड प्रभाग क्रमांक २३ मधून निवडणूक लढवणार असून, त्यामुळे येथील लढत आता चुरशीची होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanscreen For Winter: हिवाळ्यात तुमच्या त्वचेसाठी कोणतं सनस्क्रीन आहे बेस्ट, एकदा जाणून घ्या

Maharashtra Live News Update: पुण्यात पहाटे भीषण अपघात

Shocking : धक्कादायक! 45 प्रवाशांनी भरलेली खासगी बस अचानक आगीच्या भक्ष्यस्थानी, नागपुरात खळबळ

Jaggery vs Sugar: साखरेऐवजी गूळ खाणं शरीरासाठी फायदेशीर आहे का? तज्ज्ञांनी सांगितले फायदे

Jowar vs Bajra Bhakri: ज्वारी की बाजरी, वजन कमी करण्यासाठी कोणती भाकरी योग्य?

SCROLL FOR NEXT