Mahayuti News SaamTv
Video

Osmanabad Constituency : उस्मानाबादची जागा कोणाला मिळणार? महायुतीत पेच कायम | Marathi News

Confusion On Osmanabad Seat In Mahayuti : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उस्मानाबाद मतदारसंघासाठी महायुतीत पेच पडला असून आता ही जागा कोणाला मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Saam Tv

उस्मानाबाद विधानसभेच्या जागेवरून महायुतीत पेच कायम असल्याचं बघायला मिळत आहे. त्यामुळे उस्मानाबाद विधानसभेची जागा महायुतीत कोणाला मिळणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सध्या तीनही पक्षाचे नेते मुंबईत तळ ठोकून असून भाजपचे राणाजगजीतसिंह पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे तानाजी सावंत यांच्यात वर्चस्वाची लढाई आहे.

भाजपकडून नितीन काळे, अजित पिंगळे, सरोजिनी राऊत हे या जागेसाठी इच्छुक आहेत. शिंदे गटाकडून नितीन लांडगे, सुधीर पाटील, सुरज सोळंके, तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत इच्छुक असल्याचं समजत आहे. दरम्यान, अजित पवार गटाकडूनही 2019 विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार म्हणून जागेवर दावा केला आहे. शिक्षक आमदार विक्रम काळे राष्ट्रवादीकडून इच्छुक कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीलाही सुरुवात केली आहे. मनोज जरांगे यांचा पाठिंबा मिळाला तर राष्ट्रवादी शहर पवार गटाला सोडचिठ्ठी देत विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याची डॉ.प्रतापसिंह पाटील यांची तयारी असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

Edited by Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT