महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चेत 240 जागांवर सहमती झाली आहे, मात्र विदर्भ आणि मराठवाड्यातील जागांचा पेच अद्यापही कायम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही जागांवर एकापेक्षा जास्त पक्षांनी दावा सांगितल्यामुळे हा तिढा निर्माण झाला असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस याच जागांवर चर्चा होणार आहे.
विधानसभा निवडणूक जवळ येत असल्याने सर्व पक्षांकडून त्यासाठी तयारी सुरू झाली आहे. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा मात्र अद्याप सुटलेला दिसत नाही आहे. त्यासाठी गेल्या कित्येक दिवसांपासून अनेक बैठक घेत चर्चा करून देखील तोडगा निघालेला नाही. त्यामुळे उमेदवारांची आणि पक्षनिहाय जागांची यादी लांबणीवर पडत आहे. सध्या मविआमध्ये सर्व पक्षांत 240 जागांवर सहमती झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र विदर्भ आणि मराठवाड्यातील जागांचा पेच अद्याही कायम आहे. कॉंग्रेसला विदर्भात सर्वाधिक जागा लढवायच्या आहेत. यातील काही जागांवर ठाकरे गटाने देखील दावा सांगितला आहे. त्यामुळे उर्वरित 44 जागांचा तिढा महाविकास आघाडी कसा सोडवणार हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.