MVA News SaamTv
Video

MVA News : विधानसभेचा फटका! राज्यसभेत मविआचा एकच खासदार जाणार

Mahavikas Aghadi News Update : विधानसभा निवडणुकीच्या काल जाहीर झालेल्या निकालात महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. त्याचा फटका आता मविआला राज्यसभेत सुद्धा बसणार आहे.

Saam Tv

महाविकास आघाडीच्या कमी संख्याबाळाचा राज्यसभेला देखील फटका बसणार आहे. संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांना राज्यसभेवर जाता येणार नाही आहे. शरद पवार यांच्या जागेवरसुद्धा खासदार पाठवता येणार नाही, अशी माहिती समोर आली आहे. तर महाविकास आघाडीचा तीन पक्षांचा मिळून एकच खासदार राज्यसभेत जाणार आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाने मोठा फटका महाविकास आघाडीला बसला आहे. याचे संभाव्य परिणाम राज्यसभेत देखील महाविकास आघाडीला सहन करावे लागू शकतात. मविआचं संख्याबळ कमी असल्याने राज्यसभेत जाण्यासाठी लागणार कोटा पूर्ण होत नाही आहे. त्यामुळे संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदी आणि शरद पवार यांच्यातला एकच उमेदवार राज्यसभेत जाण्यासाठी निवडून येऊ शकतो. आगामी काळात देखील जेव्हा विधान परिषद निवडणुका होतील, किंवा राज्यसभेच्या निवडणुका होतील त्यावेळी देखील मविआचं संख्याबळ कमी असल्याचं दिसणार आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : सण साजरा करायला गेलेले परतलेच नाही! २४ तासांत ४९ जणांचा मृत्यू; भीषण घटनांनी देश हादरला

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात सोनं किती रुपयांनी स्वस्त; वाचा १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर

Sanjay Raut : राज्यावर ११ लाख कोटींचं कर्ज, संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; भाजपाच्या नेत्याकडून ५१ टन चारा वाटप, सोलापुरात आदर्श उपक्रम

Maharashtra News Live Update: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT