Farmers and women beneficiaries may receive direct cash benefits ahead of ZP elections. Saam Tv
Video

ZP निवडणुकीआधी लाडकीच्या खात्यात 1500 तर शेतकऱ्यांच्या खात्यात 4000?

Ladki Bahin Yojana Payment Before Elections: झेडपी निवडणुकीआधी सरकारकडून महिलांच्या खात्यात १५०० आणि शेतकऱ्यांच्या खात्यात ४ हजार रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Omkar Sonawane

मनपा निवडणुकीआधी लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता देत सत्ताधाऱ्यांनी मोठा डाव टाकला होता. आता हाच फॉर्म्युला जिल्हा परिषद निवडणुकीआधी वापरण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिका निवडणुकीप्रमाणेच आता झेडपी निवडणुकीआधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा निर्णय सरकारकडून घेतला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ४ हजार रुपये जमा होणार आहेत. यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीअंतर्गत राज्य सरकारकडून २ हजार रुपये आणि केंद्र सरकारकडून २ हजार रुपये दिले जाणार आहेत. त्याचबरोबर राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीआधी महिलावर्ग आणि शेतकऱ्यांना थेट आर्थिक दिलासा देण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असल्याचं चित्र दिसत आहे.राज्यात सध्या शेतकरी सन्मान निधीचे सुमारे ९० ते ९४ लाख लाभार्थी आहेत. त्यामुळे या निर्णयाचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार असून, त्याचा थेट फायदा ग्रामीण मतदारांपर्यंत पोहोचणार आहे. दरम्यान, निवडणुकीआधी जाहीर होणाऱ्या या आर्थिक मदतीमागे राजकीय उद्देश असल्याचा आरोप विरोधकांकडून होण्याची शक्यता आहे. तर सत्ताधारी पक्षाकडून हे निर्णय सर्वसामान्यांच्या हितासाठी असल्याचं सांगितलं जात आहे.

झेडपी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारचा हा ‘लाभांचा डाव’ कितपत यशस्वी ठरणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनिषा मांढरेंचे मॉडर्न महाविद्यालयातून निलंबन

LPG Gas Booking : सिलेंडरच्या बुकिंगचा मेसेज आलाय, पण DAC कोड खरा आहे की खोटा? कसं ओळखाल?

अनैतिक संबंधातून वहिनीला संपवलं, नंतर नेपाळमध्ये पलायन करण्याचं ठरवलं अन् कल्याण पोलिसांचा झारखंडमध्ये अटकेचा थरार

कल्याणमध्ये 5 भटक्या कुत्र्यांची निर्घृण हत्या; मृतदेह नाल्यात फेकल्याचा संतापजनक प्रकार

सत्ताधारी महिला आमदाराच्या ताफ्यावर हल्ला; भररस्त्यात गाडी अडवत केली जातीवाचक शिवीगाळ, सुरक्षा रक्षकांना मारलं

SCROLL FOR NEXT