Rain clouds gather over Konkan region as IMD issues yellow alert; heavy downpours expected today. Saam Tv
Video

Weather Update: राज्यभर पावसाचा अंदाज, कोकण, विदर्भाला यलो अलर्ट, जाणून घ्या हवामानाची स्थिती|VIDEO

Heavy rain forecast in Konkan: राज्यात हवामानात पुन्हा एकदा बदल, कोकण, घाटमाथा आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट. विजांचा कडकडाट आणि हलक्या सरींची शक्यता. तापमान तिशी पार, उकाड्यामुळे नागरिक त्रस्त. हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा.

Omkar Sonawane

राज्यात पुन्हा एकदा हवामानात बदल होताना दिसतोय. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर आज जोरदार पावसाच्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचसोबत, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्हे, तसेच विदर्भ भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात हलक्या सरींसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पावसाच्या या हालचाली असूनही राज्यात तापमानाचा पारा तिशी पार गेला आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये उन्हाचा तीव्र चटका आणि उकाडा जाणवत असून, नागरिकांची झोपेचीही तारांबळ उडाली आहे. हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, विशेषत: कोकण व घाटमाथ्याच्या भागात असणाऱ्यांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Free chicken distribution in pune : ओळखपत्र दाखवा अन् चिकन मोफत न्या; जोडप्याने वाटलं 5000 किलो चिकन मोफत, VIDEO

Monday Horoscope : वरिष्ठांच्या नजरेत प्रतिमा उंचावेल, विष्णू उपासना फायदेशीर ठरणार; 'या' राशींच्या लोकांना प्रेमात लाभ होणार

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंची युती कधी होणार? उद्धव ठाकरेंचा युतीबाबत नवा दावा?

Marathi Language Controversy: मुंबईत पुन्हा मराठी-हिंदी वाद उफाळला; परप्रांतीय महिलेचा मराठी बोलण्यास नकार, VIDEO

Couple Romance Viral video : आता याला काय म्हणावं? गर्लफ्रेंडने डोके मांडीवर ठेवले अन्...; उडत्या विमानात कपलचा रोमान्स, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT