TeacherScam Saam Tv
Video

राज्यभर गाजत असलेल्या शिक्षक भरती आणि ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा मुख्य सूत्रधाराच्या आवळल्या मुसक्या|VIDEO

Nilesh Waghmare Salary Scam Police Custody: राज्यभर शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार नीलेश वाघमारे याला पोलिसांनी चार महिन्यांनंतर अटक केली आहे.

Omkar Sonawane

नीलेश वाघमारे, शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार, अटक झाला.

बनावट शालार्थ आयडी वापरून नियमबाह्य वेतन दिल्याचे आरोप.

२०१९ पासून नागपूर जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा.

प्रशासनावर आणि शिक्षण विभागावर मोठा दबाव निर्माण झाला.

राज्यभर गाजत असलेल्या शिक्षक भरती आणि ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यात मुख्य सूत्रधार नीलेश वाघमारे याला पोलिसांनी चार महिन्यांनंतर अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत काही अधिकारी आणि एका शिक्षकाला अटक करण्यात आली होती.

नीलेश वाघमारेने बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रदान करून नियमबाह्य पद्धतीने वेतनास पात्र नसलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन दिल्याचे आरोप होते. याप्रकरणी वेतन अधीक्षक नीलेश वाघमारे यांना एप्रिल महिन्यात निलंबित करण्यात आले होते.

चौकशी अहवालात दोषी आढळल्यानंतर तो फरार झाला होता. अखेर पोलिसांनी चार महिन्यांनंतर त्याला अटक केली.

नागपूर जिल्ह्यात २०१९ पासून या घोटाळ्याद्वारे शासनाचे कोट्यवधी रुपये लाटण्यात आले होते. २०१९ ते २०२५ या कालावधीत बनावट ‘शालार्थ आयडी’ तयार करून अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमबाह्य वेतन देण्यात आले. या प्रकरणामुळे प्रशासन पातळीवर देखील खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup: नेदरलँड्सने वाढवली होती धडधड; टीम इंडियाचं गचाळ क्षेत्ररक्षण तरीही भारताचा रोमांचक विजय

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT