Vijay Wadettiwar On Ajit Pawar Saam Tv
Video

Vijay Wadettiwar On Ajit Pawar: 'परिस्थितीनुसार सगळेच बदलतात, अजित पवारांमागे काकांची पुण्याई हे स्पष्ट झालं'; विजय वडेट्टीवारांचा टोला

Maharashtra Politics: 'शरद पवार कालही आमचे दैवत होते आणि आजही मानतो', असं विधान अजित पवार यांनी केले होते. त्यांच्या या विधानवर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांना टोला लगावला आहे.

Priya More

अजित पवार यांच्यामागे काकांची पुण्याई असल्याचे स्पष्ट झाले असल्याचा टोला काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे. परिस्थितीनुसार सगळ्यांना बदलावे लागते, असं देखील त्यांनी म्हटले आहे. वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

'परिस्थितीनुसार सगळे बदलतात. अनेक जण बदलत आहेत. अजितदादा यांच्याकडून जर शरद पवारसाहेबांचा दैवत म्हणून उल्लेख होत असेल तर बीडच्या भाषणातही त्यांनी याचा उल्लेख केला आहे. पुण्याई कुणाची तर आई-वडिलांची आणि चुलत्याची पुण्याई असे ते बोलले आहेत. तर हे स्पष्ट आहे की त्यांच्यामागे काकांची पुण्याई आहे.

तसंच, 'आता दिवस दूर नाही. ३ वर्षांनी ते कुठं दिसतील याचा अंदाज येणं सुरू झाले आहे. स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावे लागणार आहे. याची तयारी दोन्ही पक्ष करणार नाही. तर अस्तित्व शून्य अशी परिस्थिती निर्माण होईल. दैवत म्हणून उल्लेख हा काकांची पुण्याई त्यांचा मागे आहे.', असं देखील वडेट्टीवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Internal Rift: काँग्रेसमध्ये चाललंय काय? माजी आमदारासह तब्बल २९ नेत्यांना धडाधड आल्या नोटीस, नेमकं प्रकरण आहे काय?

Maharashtra Farmer Scheme: आनंदी आनंद! कर्जमाफीनंतर शेतकरी, शेतमजुरांसाठी राज्य सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय

पुढील २० तासात महाराष्ट्रासह २५ राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; ताशी ७५ किमी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

गणेशोत्सवात 12 दिवस ड्राय डे! मद्यविक्रीला कुठे राहणार बंदी?

MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य; सरकारनं घेतले तीन मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT