Maharashtra Politics Saam Tv
Video

Maharashtra Politics : कोथरूड विधानसभेवरून भाजपमध्ये कलह; विद्यमान नगरसेवकाने दिला बंडखोरीचा इशारा, VIDEO

BJP corporator Amol Balwadkar against Chandrakant Patil in Kothrud: कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील विरोधात भाजप नगरसेवक अमोल बालवडकर यांनी शक्ती प्रदर्शन केलंय. त्यामुळे भाजपमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं दिसतंय.

Rohini Gudaghe

मुंबई : पुण्यात कोथरूड विधानसभेवरून भाजपमध्ये रस्सीखेच सुरू झालीय. शहर विकास समितीचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी शड्डू ठोकलाय. रक्षनाबंधाच्या पार्श्वभूमीवर आज त्यांनी बालेवाडीत शक्तिप्रदर्शन करत कोथरूड विधानसभेतून इच्छुक असल्याचं स्पष्ट केलंय. कोथरूडमध्ये सध्या उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे विद्यमान आमदार आहेत. तरीही बालवडकर यांनी इच्छुक असणं गैर नसल्याचं म्हटलंय. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना पेव फुटलंय.

पक्ष मला नक्कीच संधी देईल, असं बालवडकर यांनी म्हटलंय. इलेक्टिव्ह मॅरिटच्या आधारावर पक्ष विचार करेल. परंतु, माझा विचार न केल्यास योग्य तो निर्णय घेईल, असं म्हणत बंडखोरीचा सूचक इशारा अमोल बालवडकर यांनी दिलाय. यानिमित्ताने कोथरूड विधानसभेत भाजपमध्ये कलह सुरू झाल्याचं बघायला मिळतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red Vs Black Clay Pot: लाल की काळा, कोणत्या माठात पाणी राहील थंड?

Maharashtra Live News Update : परभणी जिल्हा परिषदेच्या ४ विशेष समित्यांची बिनविरोध निवड

मालेगाव महापालिकेत पुन्हा राडा; इस्लाम आणि MIM च्या नगरसेवकांची एकमेकांना धक्काबुक्की

पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूरसह उत्तर महाराष्ट्राला पावसाने झोडपलं; शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Pune Rain: पुण्यात अवकाळीचा हाहाकार! रस्त्यांना नदीचे स्वरूप, वाहनं पाण्यात बुडाली; पाहा थरकाप उडवणारा VIDEO

SCROLL FOR NEXT