अकोला जिल्ह्यातील हिरवखेड नगरपालिकेत शिवसेना शिंदे गटाच्या ४ नगरसेवकांना अपात्र करण्याबाबतचा ठराव विशेष सभेत मंजूर करण्यात आला. १५ विरुद्ध ५ अशा बहुमताने पारित करण्यात आलाय. जिल्ह्यातील हिवरखेड नगरपरिषदेत मोठी राजकीय घडामोड घडली असून आधीच विधानपरिषद आणि जिल्हा बँक निवडणुकीतवरुन महायुतीत तणाव असताना पुन्हा एकदा भाजपने शिवसेनेला झटका दिलाय.
हिरवखेड नगरपालिकेत शिवसेना गटाच्या चार नगरसेवकांना अपात्र करण्याबाबतचा ठराव विशेष सभेत १५ विरुद्ध ५ अशा बहुमताने पारित करण्यात आलाय. हिवरखेड नगरपरिषेदत शिवसेनेचे एकूण ५ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यापैकी, रवी घुंगड, ऋषिकेश पंचबुद्धे, रामेश्वर हागे आणि श्यामशील भोपळे या चार नगरसेवकांविरोधात भाजपच्या १२ नगरसेवकांनी अपात्रतेचा प्रस्ताव दिला होता. आज झालेल्या विशेष सभेत हात वर करून मतदान घेण्यात आलं आणि ठरावाच्या बाजूने १५, तर विरोधात ५ मतं पडलीत. त्यामुळे शिंदे सेनेच्या चार नगरसेवकांवर आता अपात्रतेची टांगती तलवार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.