Eknath Shinde  Saam TV
Video

Maharashtra Politics: 'ऑपरेशन टायगर'चं नाव बदलणार? शिंदेंच्या नेत्याचं मोठं विधान

Operation Tiger Name May Change: शिंदेसेनेच्या ऑपरेशन टायगरचे नाव बदलण्याची शक्यता आहे. शिंदेसेनेचे नेते उदय सामंत यांनी केलेल्या विधानानंतर या चर्चेला उधाण आले आहे.

Priya More

पुणे जिल्ह्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले असून पुणे जिल्ह्यात मोठी संघटना उभी करणार असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला आहे. सचिन भाऊंच्या नेतृत्वाखाली पुण्यात शिवसेना एवढी ताकदवान करू की भविष्यात आमदार-खासदार निवडून येण्यासाठी आमच्या संघटनेचा विचार करावा लागेल, असं उदय सामंत म्हणाले. भाजपने धोका दिल्याचा आरोप न करता, प्रत्येक पक्षाला स्वतःची संघटना वाढवण्याचा अधिकार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

ऑपरेशन टायगर या नावावरही त्यांनी मिश्किल टिप्पणी करत, या नावामुळे गैरसमज होत असल्याने आम्ही नाव बदलण्याच्या मनस्थितीत असल्याचं त्यांनी सांगितलं. साताऱ्यातील महायुतीतील कटुता देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार दूर करतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिप प्रकरणात एसआयटीच्या अहवालानंतर बोलणं योग्य ठरेल, असं ते म्हणाले. त्याचसोबत मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्या तरुणांच्या कुटुंबीयांना नोकरी देण्याबाबत MIDC स्तरावर निर्णय अंतिम झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Update : EPFO चा मोठा निर्णय! रिटायर्डमेंटनंतर PF मधील रक्कम टप्प्याटप्प्याने काढता येणार, काय आहे SWP योजना?

Knee strengthening exercises: गुडघ्यांमधून कटकट आवाज येतोय? गुडघ्यांच्या मजबूतीसाठी घरच्या घरी करा हे 5 सोपे व्यायाम

डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि सूज कमी करायची आहे? करून बघा हे 5 नैसर्गिक उपाय

New Marathi Serial : 'याड' नाही तर 'ओढ' लावणारी लव्हस्टोरी! नव्या मराठी मालिकेची घोषणा, मुख्य भूमिकेत कोण अन् रिलीज डेट काय?

Maharashtra News Live Update: BMC-उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे नांदेड विमानतळावर आगमन

SCROLL FOR NEXT