Jyoti Mete Saam Tv
Video

Maharashtra Politics: महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोण? सरकारी नोकरी सोडून राजकारणात आलेल्या महिला नेत्याची वर्णी लागणार

Maharashtra Women Commission chairperson: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी ज्योती मेटे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्या लवकर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Priya More

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यापासून महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी ज्योती मेटे यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ज्योती मेटे यांची या पदावर वर्णी लागण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

काही दिवसांपूर्वी ज्योती मेटे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट देखील घेतली होती. आता ज्योती मेटे या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. ज्योती मेटे या दिवंगत राजकीय नेते विनायक मेटे यांच्या पत्नी आहेत. प्रशासकीय कामकाजामधला ज्योती मेटे यांना दांडगा अनुभव आहे. बारामती आणि राहुरी निवडणुकीनंतर लवकरच याबाबत निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Dogs: पुणे पालिकेचा गजब कारभार! भटक्या कुत्र्यांची होणार गणना; 25 लाखांचा खर्च करणार

कुर्ती, ड्रेस आणि साड्यांवर सुंदर दिसतील शॉर्ट मंगळसूत्र, लेटेस्ट, ट्रेंडी 5 डिझाईन्स

मोठी बातमी! मनोज जरांगेंची निर्णायक आंदोलनाची घोषणा, तारीखही सांगितली, फडणवीसांना काय दिला इशारा?

Diabetes : पावसाळ्यात थोडासा निष्काळजीपणा मधुमेहींसाठी घातक, 'या' गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास समस्या आणखी वाढेल

Cyber Crime : '1930' सायबर हेल्पलाइनच ठरली फसवणुकीचे हत्यार; खाती गोठवून लाखोंची खंडणी, आरोपी गजाआड

SCROLL FOR NEXT