Ajit Pawar And Uddhav Thackeray saam tv
Video

Ajit Pawar: 'खरी शिवसेना ठाकरेंची', अजित पवारांचा जुना VIDEO पुन्हा चर्चेत

Ajit Pawar Video: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक जुना व्हिडीओ चर्चेत आला आहे. पालिका निवडणुकीदरम्यान त्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते खरी शिवसेना नेमकी कुणाची हे सांगताना दिसले.

Priya More

राज्यातील महानगर पालिका निवडणुकीदरम्यान राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. बंडखोरांनी अर्ज माघारी घ्यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशातच शिवसेना ठाकरे गटाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक जुना व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये अजित पवार यांनी शिवसेनेचा इतिहास सांगितला. त्यांनी खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांची कशी याबाबत भाष्य या व्हिडीओमध्ये केले आहे.

'प्रबोधनकार ठाकरे यांनी शिवसेना नाव दिले. त्यांनी शिवसेना वाढवली. मराठी माणसांना ताकद देण्यासाठी त्यांनी शिवसेना वाढवली. त्या मराठी माणसाने साध्या साध्या कार्यकर्त्याला आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं, मुख्यमंत्री केलं. मनोहर जोशी आणि नारायण राणे यांचा सुरूवातीचा काळ आठवा. यांना बाळासाहेबांनी मोठं केलं.', असे अजित पवार व्हिडीओत बोलताना दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Metro : मुंबई मेट्रोवर 'नागिनचा' कब्जा, चाहकांना थक्क करणारा अनुभव, VIDEO व्हायरल

मोठी बातमी; एबी फॉर्म खाणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागे, कारण आलं समोर

Maharashtra Live News Update: कल्याणी कोमकर अजित पवारांच्या भेटीला

Amaravati Tourism: गुलाबी थंडीच्या दिवसात अमरावतीमध्ये करा फिरण्याचा प्लान; 'हे' Hidden spots ठरतील बेस्ट ऑप्शन

Winter Season : हिवाळ्यात लसूण का खावा? जाणून घ्या फायदे

SCROLL FOR NEXT