Chhagan Bhujbal- Suhas Kande Politics  SAAM TV
Video

Maharashtra Politics | Chhagan Bhujbal 'तुतारी'चं काम करतात, कांदेंनी थेट पुरावेच दाखवले

Chhagan Bhujbal vs Suhas Kande : मंत्रिपद महायुतीच्या कोट्यातून घ्यायचं आणि काम 'तुतारी'चं करायचं. एवढाच जर तुतारीचा पुळका येत असेल तर, मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि खुशाल तुतारीचं काम करावं, असा हल्लाबोल शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांच्यावर केलाय.

Saam TV News

मंत्रिपद महायुतीच्या कोट्यातून घ्यायचं आणि काम 'तुतारी'चं करायचं. एवढाच जर तुतारीचा पुळका येत असेल तर, मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि खुशाल तुतारीचं काम करावं, असा हल्लाबोल शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांच्यावर केलाय. ते नाशिकच्या नांदगावच्या मेळाव्यात बोलत होते.

कांदे यांच्या आरोपांवर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमचे लोक प्रामाणिकपणे भारती पवार यांचा प्रचार करत आहेत. जिथं एखाद्या आमदाराशी पटत नसेल तर तिथं आपण वेगळ्या प्रकारे महायुतीचाच प्रचार करायचा. वेगळं ऑफिस, फ्लेक्स, यंत्रणा असेल ती आपण उभी करायची, असं म्हणत उत्तर द्यायची इच्छा नाही, असे भुजबळ म्हणाले.

दुसरीकडे, सुहास कांदे यांनी याबाबत पुरावेच दाखवले आहेत. छगन भुजबळ अजितदादांसोबत आहेत, तर त्यांच्या लेटरहेडवर अजित पवार यांचा फोटो का नाही, असा प्रश्न कांदे यांनी उपस्थित केला आहे. लेटरहेडवर भुजबळ यांच्यासोबत शरद पवार यांचा फोटो आहे, याचा पुरावाच कांदे यांनी दाखवला आहे. याशिवाय काही फोटोही कांदे यांनी माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर दाखवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

Maharashtra Weather : राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान, 'या' दिवशी कोसळणार मुसळधार; हवामान खात्याचा मोठा इशारा

Cancer : भूक कमी झालेय? जठराच्या कॅन्सरचा असू शकतो धोका, दुर्लक्ष करणं पडेल महागात

Thusday Horoscope : आज ग्रहांची मोठी उलथापालथ होणार! या ६ राशींचे नशीब फळफळणार; गुरुवारचे राशीभविष्य

Kuka Cold Coffee Recipe: संध्याकाळी नाश्त्यासोबत घरी बनवा कॅफेसारखी स्वादिष्ट आणि क्रिमी कुक्का कॉफी, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT