BJP Teachers’ Wing Leader Shekhar Bhoyar issues a stern warning to MLA Prashant Bamb amid growing outrage over remarks against teachers. Saam Tv
Video

...तर तोंडाला काळं फासल्याशिवाय शांत बसणार नाही, भाजप नेत्याचा आमदार प्रशांत बंब यांना इशारा|VIDEO

Shekhar Bhoyar Warning To Prashant Bamb: भाजप आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांविरोधात केलेल्या अर्वाच्य वक्तव्यावरून मोठा वाद चिघळला आहे. भाजप शिक्षक आघाडीचे शेखर भोयर यांनी इशारा देत सांगितले की पुन्हा अशी भाषा वापरली तर शिक्षक रस्त्यावर उतरतील.

Omkar Sonawane

भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांविरोधात केलेल्या वक्तव्यावरून वाद चिघळला आहे. शिक्षकांबद्दल पुन्हा अर्वाच्य भाषेत बोलले तर आम्ही त्यांना काळं फासल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक शेखर भोयर यांनी दिला आहे.

शिक्षक संपावर असताना त्यांची वेतनकपात न करता त्यांना सस्पेंड करण्याची मागणी आमदार प्रशांत बंब यांनी केली होती. यावर संताप व्यक्त करत भोयर म्हणाले की चार फुटाचे आमदार प्रशांत बंब देशाची पिढी घडवणाऱ्या शिक्षकांविषयी वारंवार अर्वाच्य भाषेत बोलत असतात. प्रत्येक समाजात दोन-तीन टक्के वाईट लोक असतात म्हणून संपूर्ण शिक्षक समाजाला बदनाम कसे करता येईल?

यापुढेही आमदार बंब यांनी शिक्षकांविषयी अर्वाच्य भाषा वापरली, तर शिक्षक रस्त्यावर उतरतील आणि काळ फासल्याशिवाय राहणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Metro 8: मुंबई, मानखुर्द ते पनवेल, 11 स्थानकं कोणती? कसा असेल मुंबई-नवी मुंबई जोडणारा मेट्रो ८ चा प्रोजेक्ट?

Maharashtra Tourism : धुक्याची चादर अन् दाट जंगल; विदर्भातील सर्वात सुंदर हिल स्टेशन, हिवाळ्यात नक्की जा

पुण्यात अपघाताचा थरार; नवले पुलाजवळ दिवसभरात दुसरा भीषण अपघात

Maharashtra Politics: महायुतीत फोडाफोडी बंद, पण 'ठणाठणी' सुरूच; कल्याण-डोंबिवलीतलं राजकारण पुन्हा तापलं

Maharashtra Live News Update: पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा अपघात

SCROLL FOR NEXT