nashik news  saam tv
Video

Maharashtra Rain Update: दिवसाढवळ्या मिट्ट काळोख, विजांचा कडकडाट, पावसाचं धुमशान; ड्रोनने काढलेला VIDEO बघून धडकी भरेल!

Nashik News: नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात काल मध्यरात्रीपासूनच पावसाने झोडपून काढले आहे, मात्र यंदा लवकर झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Omkar Sonawane

अजय सोनवणे, साम टीव्ही

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात सोमवारी संध्याकाळी विंचूर, मरळगोई, गोंदेगाव परिसरात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतशिवारात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून, शेतीचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पावसाचा जोर इतका होता की काही भागांत झाडे उन्मळून पडली, तर शेतकरी वर्गाला आपली पिकं वाचविण्यासाठी धावपळ करावी लागली. या नैसर्गिक आपत्तीमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या संपूर्ण दृश्याचे ड्रोनच्या माध्यमातून टिपले गेलेले चित्रण प्रसिध्द छायाचित्रकार पंडित मुदगल यांनी केले आहे. त्यांच्या कॅमेऱ्यात कैद झालेले हे दृश्य सोशल मीडियावरही झपाट्याने व्हायरल होत आहे.

संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीची कार्यवाही करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

E-Scooter: ई-स्कूटर खरेदी करताना 'या' गोष्टींकडे लक्ष द्या, निवडताना काय तपासावे?

Monsoon Update : सप्टेंबर २०२५मध्ये मुसळधार पाऊस; तब्बल १०९% पावसाचा अंदाज

Nanded : मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ महालक्ष्मी सणावर विरजण; मराठा महिलांनी घेतला निर्णय

Priya Marathe Death: 'तिच्यासोबतच मी स्वतःला शोधलं...'; जिव्हाळ्याची मैत्रीण गेल्यानं प्रार्थना बेहेरेला अश्रू अनावर

Manoj jarange patil protest live updates: सीएसएमटी रेल्वे स्थानक परिसरात डॉग स्कॉड पथकाकडून पाहणी

SCROLL FOR NEXT