Maharashtra Maritime Board SAAM TV
Video

Maharashtra Maritime Board : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कामगारांना दीवाळी बोनस, किती मिळणार रक्कम?|VIDEO

Nitesh Rane : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या संचालक मंडळाची ८५ वी बैठक नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या बैठकीत महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा यावेळी मंत्री नितेश राणे यांनी केली.

Ganesh Kavade

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या संचालक मंडळाची ८५ वी बैठक आज दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा महाराष्ट्र सागरी मंडळाचे अध्यक्ष श्री.नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत महाराष्ट्र सागरी मंडळाच्या आस्थापनेवरील तसेच बाह्ययंत्रणेद्वारे नियुक्त (कंत्राटी) कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा यावेळी मंत्री नितेश राणे यांनी केली.

या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी दीपावली सणानिमित्त महाराष्ट्र सागरी मंडळाच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ₹५०,०००/- इतके सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मंत्री नितेश राणे यांनी केली. तसेच मंडळात बाह्ययंत्रणेद्वारे नियुक्त (कंत्राटी) कर्मचाऱ्यांना प्रथमच प्रत्येकी ₹२०,०००/- इतके सानुग्रह अनुदान देण्याची ऐतिहासिक घोषणा देखील यावेळी मंत्री नितेश राणे यांनी केली.

या निर्णयामुळे महाराष्ट्र सागरी मंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा दीपावली सणाचा उत्साह आणि आनंद द्विगुणित झाला असून या निर्णयाबद्दल कर्मचाऱ्यांनी यावेळी मंत्री नितेश राणे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. तसेच मंडळाच्या कार्यक्षमतेत सातत्याने वाढ घडवून आणण्यासाठी आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कल्याणाचा विचार करून सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल मंत्री नितेश राणे यांच्या भूमिकेचे स्वागत करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Chikoo Benefits: डायबिटीज असलेली व्यक्ती चिकू खाऊ शकते का? जाणून घ्या

Cyclone Arnab: चक्रीवादळ अर्नब येणार? 3 राज्यांत वर्षातील पहिल्या वादळाचा धोका, मुसळधार पावसाचा अलर्ट!

Knee Pain: मांडी घालून बसल्यावर उठताना नेहमी गुडघे दुखतात? दुर्लक्ष करू नका, असू शकते ‘या’ आजारांचे लक्षण

घराबाहेर पडताना खिशात ठेवा 'हा' १ पदार्थ, पाकीट कायम पैशांनी भरलेले राहील

SCROLL FOR NEXT