Hingoli Women death due to heatstroke saam tv
Video

Maharashtra heatwave : महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा तडाखा; ४८ वर्षीय महिलेचा मृत्यू, VIDEO

First death of heatstroke in Hingoli : महाराष्ट्रात उष्णतेची लाट आली असून, त्याचा सर्वाधिक तडाखा मराठवाड्यासह विदर्भाला बसला आहे. हिंगोलीत एका ४८ वर्षीय महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली.

Nandkumar Joshi

संदीप नागरे, हिंगोली | साम टीव्ही

विदर्भ, मराठवाड्यासह जवळपास सर्वच जिल्ह्यांत उष्णतेची लाट आली. या लाटेचा सर्वाधिक तडाखा विदर्भात आणि त्यानंतर मराठवाड्यात बसला. हिंगोलीत उष्माघातानं पहिला बळी घेतला. औंढा तालुक्यातील गोजेगाव येथील एका ४८ वर्षांच्या महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेतात काम करून घरी आलेल्या महिलेला उष्मघाताचा त्रास जाणवल्याने रुग्णालयात दाखल केलं; मात्र उपचाराआधीच मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. अरुणा संजय सांगळे असं मृत महिलेचं नाव आहे.

शेतावरून आली अन् अस्वस्थ वाटू लागलं

ही महिला शेतावर गेली होती. शेतातील काम उरकून एका विवाह सोहळ्याला उपस्थित राहायचं असल्यानं ती घरी आली. घरी आल्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागलं. उष्माघाताचा त्रास जाणवू लागल्यानं तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण तिथं उपचाराआधीच तिचा मृत्यू झाला, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. महिलेला उष्माघाताचा त्रास जाणवत होता, अशी माहिती नातेवाईकांनीही दिली.

विदर्भातील जिल्हे होरपळले

दरम्यान, विदर्भात आज प्रचंड ऊन होते. जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंश सेल्सियसच्या पुढे नोंदवले गेले. अकोला - 46.9 अंश सेल्सियस, अमरावती - 46.8, बुलढाणा - 43.5 , भंडारा - 44.0, ब्रह्मपुरी - 44.2, चंद्रपूर - 45.0, गडचिरोली - 44.6, गोंदिया - 44.4, नागपूर - 45.4, वर्धा - 46.4, वाशिम - 44.6, यवतमाळ - 46.0 अंश सेल्सियस इतके तापमान नोंदवले गेले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tharala Tar Mag! : "सगळे पुरावे खोटे..."; अर्जुननं कोर्टात बाजी पलटली, सायलीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी लढवली अनोखी शक्कल| VIDEO

Maharashtra News Live Update : वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पाचा जलसाठा पोहोचला 35 टक्क्यांवर

Highway tyre puncture: हायवेवर टायर पंक्चर झाल्यास काय कराल?

Oral Health Tips: रोज फक्त 2 मिनिटांचा हा उपाय ठरू शकतो दातांसाठी फायदेशीर; डॉक्टरांनी सांगितल्या तोंडाच्या आरोग्याच्या महत्त्वाच्या सवयी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? ८ दिवसांत पैसे जमा होण्याची शक्यता, महत्त्वाची अपडेट समोर

SCROLL FOR NEXT