अभिनेता विकी कौशल आणि पुष्पा फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा बहुप्रतिक्षित छावा चित्रपटाचा ट्रेलर आला आणि वाद सुरू झाला. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि येसुबाई यांना नाचताना दाखवण्यात आलं आहे. लेझीम खेळताना दाखवलेल्या या सीनवर शिवप्रेमींनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. हा संभाजी महाराजांचा अपमान असल्याचं म्हणत शिवप्रेमींनी सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका जाहीर केली आहे.
यानंतर आता सरकारनेही वादात उडी घेऊन छावा चित्रपट तज्ज्ञ आणि जाणकारांना दाखवल्याशिवाय प्रदर्शित करू नये अशी भूमिका जाहीर केली आहे.
पण छावा च नव्हे तर या यापूर्वीही अनेक ऐतिहासिक सिनेमातील दृश्यांवरुन वाद पेटले होते..पाहुयात कुठले चित्रपट होते ते...
द लिजंड ऑफ भगत सिंह (2002) - काही दृष्यांवर आक्षेप घेण्यात आला होता
जोधा अकबर (2008)- राजस्थान, उत्तरप्रदेश, हरयाणा, उत्तराखंडमध्ये बंदी आणण्यात आली होती
बाजीराव मस्तानी (2015) - बाजीराव आणि मस्तानी या दोघांच्या वंशजांनी चित्रपटावर आक्षेप नोंदवला होता.
मोहेंजोदारो (2016) - हडप्पा संस्कृतीशी संबंधित इतिहास आणि तथ्यांशी विसंगती करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.
पद्मावत (2018) - करणी सेनेने आक्षेप नोंदवला होता, प्रचंड विरोधानंतर पद्मावती वरून चित्रपटाचं नाव बदलावं लागलं
तान्हाजी द अनसंग वॉरियर (2020) - ट्रेलर आणि दृष्यांवर संभाजी ब्रिगेडचा आक्षेप
एकूणच सिनेमा बनवताना अभिव्यक्ती स्वातंत्र्य घेण्याच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड केली गेल्याचा इतिहास आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट ही याला अपवाद ठरलेला नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.